चेलाडी फाटा ते तांभाड(ता.भोर) पर्यंत आमदार लांडेची विजयी रॅली; फटाक्यांच्या आतेषबाजीसह गुलालाची उधळण
भोर – मुंबई- चांदवली विधानसभेवर निवडून आलेले शिवसेनेचे आमदार दिलीप लांडे यांचे त्यांच्या मूळ गावी तांभाड (ता. भोर) येथे जंगी स्वागत करण्यात आले . आमदार लांडे यांची चेलाडी फाटा ते तांभाड पर्यंत रविवार (दि२४) जंगी विजयी मिरवणूक काढण्यात आली . यावेळी कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत फटाकाच्या आतिषबाजी केली. लांडे यांनी मांढरदेवीची काळुबाई, धावजी पाटील , श्री क्षेत्र बनेश्वर, व गावच्या सालपाईदेवी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी जांभळीचे संतोष कोळपे आणि मित्र परिवार, नसरापूर येथील बनेश्वर चे सचिव अनिल गयावळ, कुरुंजाई देवस्थान ट्रस्टचे रमेश शेळीमकर, दत्ताबापू खुटवड, नसरापूर उपसरपंच सुधीर वाल्हेकर, संदीप कदम, नामदेव चव्हाण, शुभम जगताप, प्रकाश जंगम, अर्चना जंगम, सागर राशिनकर , माऊली शेटे ,संकेत हाडके, गौरव जाधव, अमोल शिळीमकर, अनिल गायवळ, प्रदिप खुटवड, नथू खुटवड, अनिल रसाळ, गणेश वरखडे, विनोद कोळपे, आदित्य खुटवड, सोहम खुटवड, निखिल खुटवड, श्रेयश आवळेकर, कविता हाडके, अलका शेटे, राजमहंमद शेख, प्रसन्न गयावळ, वर्षा गयावळ, स्वाती काजळे, उज्वला निकम,अक्षय गयावळ आदींनी लांडे यांचे जंगी स्वागत केले.
मुंबईतील चांदवली मतदार संघातील मतदारांनी माझ्यावर खूप विश्वास दाखवल्याने मी विजयी झालो तेथील विकास करण्याबरोबरच मी माझ्या जन्मभूमीत असलेल्या गावांच्या विकास कामांवर व गुंजवणी खोऱ्यातील समस्या सोडवण्यासाठी प्रामुख्याने लक्ष देणार आहे असणार आहे भोरमधील जनतेने देखील मला भरभरुन प्रेम दिले आहे असे आमदार दिलीप लांडे यांनी यावेळी सांगितले.