भोरः सध्या राज्यात गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. त्यानंतर काही दिवसांमध्ये आचारसंहिता लागण्याची शक्यता असून, विधानसभेची निवडणूक लागण्याचे संकेत मिळत आहेत. भोर विधानसभा क्षेत्रात भोर-वेल्हा(राजगड)-मुळशी या तीन तालुक्यांचा सहभाग असून, येथील मतदाराराजा कोणाच्या पारड्यात आपले बहूमूल्य मतं देणार हे पाहणे औचुक्याचे असणार आहे.
राजगड न्यूज याच अनुषंगाने येथील मतदारराजाच्या मनातील प्रश्न जाणून घेऊन त्याच्यावर सविस्तर वार्तांकन करणार आहे. या वार्तांकनाची टॅगलाईन #कौल जनतेचा अशी असणार आहे. या विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या तिन्ही तालुक्यात जाऊन तेथील नागरिकांशी संवाद साधला जाणार असून, आमच्या टॅलाईननुसार सत्यता हीच आमची ओळख यानुसार सत्य परिस्थिती आपल्या सर्वांसमोर मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे.
या तिन्ही तालुक्यातील नागरिकांशी आम्ही संवाद साधणार असून, जनतेच्या अडीअडीचणी जाणून घेऊन त्या सर्वांसमोर मांडण्यात येणार आहेत. तसेच जनतेला लोकप्रतिनिधींकडून काय अपेक्षा आहेत, त्यांच्या आजपर्यंतच्या प्रश्नांची सोडवणूक झाली आहे का, भविष्यात कोणते प्रश्न जनतेला भेडसवणार आहेत, त्यावर जनतेला काय वाटते, लोकप्रतिनिधींचा लेखाजोखा, या विधानसभा क्षेत्रातून संभाव्य इच्छुक उमेदवारांसदर्भात मतदारराजाची कोणाला पसंती मिळणार, त्यांच्या मनातील लोकप्रतिनिधी कोण, आजपर्यंत कोणती कामे या विधानसभा क्षेत्रात झालली आहेत आणि येथून पुढच्या काळात कोणती कामे केली जाणार आहेत, याबद्दल जनेतेचे मत काय असणार आहे, तसेच येथील जनतेला दिलेल्या आश्वसनांची पूर्तता झाली आहे का, याबद्दल त्यांच्याकडून जाणून घेतले जाणार आहे. यामुळे आपल्या भागातील प्रश्न, समस्या यासाठी राजगड न्यूजचे संपादक जीवन सोनवणे यांनी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
राजगड न्यूजला आजपर्यंत ७ लाख वाचक वर्गाने दिलेला प्रतिसाद हा आमच्यासाठी बहुमूल्य आ्हे, यामुळेच राजगड न्यूज #कौल जनतेचा ही सिरीज घेऊन आपल्यासर्वांसमोर येणार आहे. या सिरीजला आपल्या सर्वं वाचक वर्गाचा असाचा प्रतिसाद लाभा. या सिरीजच्या माध्यमातून भोर-वेल्हा(राजगड)-मुळशी तालुक्यातील नागरिकांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी व ते प्रश्न इच्छुक उमेदवारांपर्यत पोहचविण्यासाठी आम्ही #कौल जनतेचा ही सिरीज घेऊन येत आहेत. आपल्या भागातील समस्या, प्रश्न आदीबाबत आजच्या आमच्याशी संपर्क साधा
-जीवन सोनवणे(राजगड न्यूज संपादक)
मोबाईल नंबर ७७७००२०२०२