भोर प्रतिनिधी -कुंदन झांजले
भोर तालुक्यातील कांबरे खे.बा. येथे भोर वेल्हा मुळशीचे आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते जल जीवन मिशन योजनेंतर्गत १ कोटी ९२ लक्ष रु. निधीतून मंजूर केलेल्या पाणी पुरवठा योजनेच्या कामाचे भूमिपूजन रविवार (दि.२१) करण्यात आले.
यावेळी राजगड सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन पोपटराव सुके, संचालक शिवाजी कोंडे, अशोक शेलार,भोर पंचायत समितीचे मा.उपसभापती लहुनाना शेलार, भोर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रणजित बोरगे, विठ्ठल गोरे, कारखान्याचे मा.संचालक दिलीप कोंडे, सा.कार्यकर्ते माऊली पांगारे, ईश्वर पांगारे, बाबू झोरे यांच्यासह सरपंच सागर शिंदे उपसरपंच पार्वती यादव, ग्रा प सदस्य श्रीरंग कोंढाळकर, प्राचीताई महांगरे, संगिता कोंढाळकर, नंदा निगडे, दशरथ मांढरे,पो.पाटिल सुमित कांबळे, तंटामुक्ती अध्यक्ष रामदास यादव, सा.कार्यकर्ते मयूर कोंढाळकर, कांताबापु यादव, प्रशांत मोहिते, अमर कोंढाळकर, प्रतिक शिंदे, दादा सणस, मामा पोमण, दादा कोंढाळकर, सोमनाथ धनावडे, प्रकाश यादव, आबासो मोहिते, संतोष निगडे, बापू नाईलकर, दादा शेलार, रामभाऊ गिरे, सुभाष मोहिते, उत्तमराव कोंढाळकर, राजाराम कोंढाळकर, दिपक शिंदे, साहेबराव चव्हाण, बापू कोकरे आदी ग्रामस्थ व कांबरेश्वर युवा प्रतिष्ठान युवक कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
करंदी खे बा ,कांबरे खे बा तसेच आजूबाजूच्या गावांची विकासकामे पुर्ण करुन रखडलेल्या कामांनाही गती देऊन या गावांचे नाव नकाशावर आणणार असल्याचे आमदार थोपटे यांनी यावेळी सांगितले.