भोरः अपक्ष उमेदवार कुलदीप कोंडे यांनी विराट सभा घेत प्रचाराचा दणक्यात शुभारंभ केला. सभेच्या माध्यातून कोंडे यांनी प्रस्थापितांविरोधात सलणाऱ्या गोष्टींची राळ उठवत यंदा परिवर्तनाचे साक्षीदार होण्याचे आवाहन नागरिकांना सभेद्वारे केले आहे. स्वःताला कार्यसम्राट म्हणवत मिरवत बसायचे अशी टीका कोंडे यांनी संग्राम थोपटे यांचे नाव न घेता केली. ५ वर्ष मला संधी द्या, तालुक्याचा कायापालट केल्याशिवाय राहणार नसल्याचे कोंडे यांनी सांगितले. तसेच मी गरीब आहे पण दिलदार असल्याचे कोंडे यांनी यावेळी म्हणाले. कचऱ्या संदर्भातील विषयाला हात घालत कोंडे यांनी अनेक प्रश्नांची विचारणा सभेच्या माध्यमातून केली आहे.
‘त्या’ काळात तुम्ही अज्ञातवासात निघून गेला होताः कोंडे
नसरापूर, कापूरव्होळ, किकवी याचा काय विकास झाला, भोर शहरातील कचऱ्याची काय व्यवस्था आहे, कारखान्याची काय अवस्था झाली आहे. असे एक ना अनेक प्रश्न कोंडे यांनी उपस्थित केले आहे. तुम्हाला कारखाना जर चालवायला येत नसेल तर राजीनामा द्या, असे देखील ते यावेळी म्हणाले. स्वःताच्या नाकर्तेपण झाकण्यासाठी इथल्या जनतेला विठेस धरून त्यांचा छळ केल्याचा आरोप कोंडे यांनी केला. कोरोना काळात तुम्ही अज्ञात वासात निघून गेला होता, असा सवाल करीत त्या काळात कोरोनाबाधित असणाऱ्या लोकांशी फोनवरून संपर्क साधत त्यांची विचारपूस केली. ज्या रुग्णांना अॅाक्सिजनची गरज आहे त्यांना अॅाक्सिजन पुरवण्याचे काम केले. रेमेडिसिव्हिर इंजेक्शन उपलब्ध करून दिले. ज्यांना प्लॅाज्माची गरज होती, त्यांना त्याची व्यवस्था करून दिली. स्वःताच्या शेतातील कांदा गरिबांना पुरवला असल्याची आठवण त्यांनी यावेळी केली.
निवडणुकीच्या आखाड्यात भिडू दाखल
लोकांच्या सुखःदुखात त्यांना धीर देण्याचे काम मी केले आहे. तुम्ही ते केले नाही, सतत विकास केला असे सांगता तर नेमका कोणता विकास केला हे त्यांनी सांगावे, असे देखील कोंडे यांनी सभेच्या माध्यतून प्रश्न उपस्थित केला आहे. कोंडे यांच्या सभेला मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय लाभलेला दिसून आला. यामुळे या मतदारसंघात हाय व्होल्टेज लढत पाहिला मिळणार आहे. निवडणुकीच्या आखाड्यात अनेक भिडू दाखल झाले आहेत. मात्र मुख्य लढत चौघांभोवती फिरणार असल्याचे येथील राजकीय जाणकार सांगतात.