७१ रक्तदात्यानी केले रक्तदान, रक्तदान हेच श्रेष्ठदान
भोरला सामाजिक नवनवीन उपक्रमात नेहमीच अग्रेसर असणारे व मानाचे दुसरे गणपती असणारे भोर शहरातील नागराज तरुण मंडळाने रक्तदान शिबिर घेत रक्तदान हेच खरे श्रेष्ठदान असुन पुन्हा एकदा सामाजिक कार्यास हातभार लावला. पुरंदर ब्लड सेंटर सासवड पुणे व चाकण ब्लड सेंटर चाकण पुणे यांच्या विशेष सहकार्यातुन हे रक्तदान शिबीर घेण्यात आले.यावेळी ७१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
यामध्ये मंडळातील सभासदांसह , शहरातील तसेच आजूबाजूच्या परिसरातील तरूणांनी रक्तदान शिबीरत भाग घेतला. रक्तदान केलेल्या रक्तदात्यास सन्मानपत्र व एक विशेष भेटवस्तू देण्यात आली.रविवार (ता.८) शहरातील नागोबाआळीतील गणेश मंदिरात सकाळी ९ ते सायंकाळी५ या वेळेत हे शिबिर घेण्यात आले
या रक्तदान शिबिराचे आयोजन मंडळाचे अध्यक्ष अक्षय मोहिते, गणेश मोहिते,संकेत भेलके, विकास भेलके, विनोद खोपडे यांनी केले.तर यासाठी नगरसेविका सोनम गणेश मोहिते , नगरसेवक देवीदास गायकवाड, बजरंग शिंदे यांचे विशेष सहकार्य लाभले.