SK Organic Farm & Agero Sarvices या नावाने केंद्र , नोकरी उद्योग धंद्याला फाटा देत खुटवड परिवारातील सौरभ खुटवड तरुण आधुनिक, प्रयोगशील शेतकरी
भोर तालुक्याच्या वेळवंड खोऱ्यामधील बारे खुर्द येथील प्रगतिशील आणि प्रयोगशील शेतकरी दत्तात्रय खुटवड यांचे सुपुत्र सौरभ व अजय खुटवड यांनी नोकरी उद्योग धंद्याला फाटा देत शेती व्यवसाय अवलंब करीत शेतीमध्ये नवनवीन आगळे वेगळे नवनवीन प्रयोग करीत आधुनिक शेती कशी करावी व ती कशी जोपासावी याकरिता रासायनिक खतांचा वापर टाळावा, सेंद्रिय खते वापरावी व ही सेंद्रिय खते निर्माण कशी करावी याबाबतचे एसके ऑरगॅनिक फार्म ॲन्ड ॲग्रो सर्विसेस या नावाने तालुक्यातील पहिले विषयक प्रशिक्षण व मार्गदर्शन केंद्र बारे खुर्द येथे आपल्या शेतात सुरू केले असून याचा शुभारंभ भोर पंचायत समितीतील कृषी अधिकाऱ्यांसमवेत रविवार (दि.२२) झाला.
यावेळी तालुका कृषी मंडळ अधिकारी प्रशांत सरडे, विस्तार अधिकारी शिवराज पाटील, तंत्र व्यवस्थापक लक्ष्मीकांत कणसे, कृषी सहाय्यक रोशन पवार,कृषी सहाय्यक योगेश अंभोरे,तुषार साळेकर ,दिपक येडवे ,माऊली बदक, ह भ प सायली बांदल, प्रवीण बदक,सरपंच सविता गायकवाड, संतोष खुटवड, मुरलीधर खुटवड, प्रकाश खुटवड , पांडुरंग खुटवड, दिनकर शिवतरे, अनिल झांजले, गोरख बदक, लक्ष्मण बदक, सोपान बदक,पो पाटील निखिल भालेराव व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कृषी अधिकाऱ्यांनी माहिती, मार्गदर्शन करत आजच्या या विज्ञान युगात सेंद्रिय शेतीचे महत्व व ती का आवश्यक आहे याचे मार्गदर्शन केले . पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी उपस्थितांचा सन्मान एक झाड व तयार केलेले गांडूळ खत देऊन झाडे लावा, झाडे जगवा, झाडे वाचवा असा संदेश देण्यात आला.