सहाय्यक निबंधक कार्यालयात कामगारांना धनादेशाचे वाटप
भोरच्या श्री मार्केडेय हातमाग सहकारी सूतगिरणीच्या ६६० कामगारांच्या लढ्याला अखेर यश आले असून या कामगारांना औद्योगिक न्यायालयाच्या आदेशानुसार मिळणाऱ्या देणे रक्कमेच्या धनादेशाचे वाटप मंगळवार (दि.१३) सहाय्यक निबंधक व या सुतगिरणीचे अवसायक बाळासाहेब तावरे यांच्या हस्ते भोरच्या राजवाडा सहाय्यक निबंधक कार्यालयात करण्यात आले. एकूण कामगारांचे असणारे ६१ लाख रुपयांचे देणे रक्कम धनादेश याठिकाणी देण्यात आले.
सन १९७२ साली सुरू झालेली यशवंत सहकारी हातमाग सुतगिरणी १९८५ साली बंद त्यांनतर त्या सुतगिरणीचे हस्तांतरण होऊन श्री मार्केडेय हातमाग विणकर सहकारी सुतगिरणी मर्यादित नामकरण झाले पुढे १९९५ साली ही सूतगिरणी अवसायनात निघाली. कामगारांचे पगार ,पगारी रजा पगार ,बोनस, लॅब पगार ,ग्रॅज्युटी, असे मिळून कामगारांचे सुमारे ७५ लाख ७३ हजार सातशे बेचाळीस रुपयांचे देणे थकले. आणि कामगारांचा न्यायालयीन लढा सुरू झाला. सदर सुतगिरणीच्या जून्या मालमत्तेचे मूल्यांकन कायदेशीर रित्या रितसर १७ लाख करण्यात आले त्यांनंतर रितसर ई ऑनलाईन पध्दतीने या मिळकतीमधील असणाऱ्या मालमत्तेचे, स्क्रॅप मटेरियची विक्री करून १७ लाख मुल्यांकन झालेल्या मालमत्तेचे कामगारांच्या नशीबाने सुमारे ८३ लाख ८३ हजार मिळाले. यातील काही कामगारांचे १५ लाख रुपयांचे देणे डिसेंबर २०१७ वाटप झाले आहे. उर्वरित कामगारांचे ६१ लाखांच्या रेखांकित धनादेशाचे गणेश जयंतीच्या शुभमुहूर्तावर आठवडे बाजार मंगळवारी करण्यात आले अजुनही औद्योगिक न्यायालयाच्या आदेशानुसार कामगारांच्या रखडलेल्या रक्कमेवर १ कोटी १८ लाख व्याज मिळणार असून कामगारांना त्या रक्कमेचे वाटप संबंधित मालमत्ता गेल्यावर पुढील टप्प्यात करण्यात येणार आहे असे सहाय्यक निबंधक बाळासाहेब तावरे यांनी सांगितले. तीस वर्ष रखडलेल्या कामगारांचे देणे मिळाल्यानंतर धनादेश घेताना कामगारांच्या चेह-यावर आनंद, समाधान व्यक्त झाले.तर काही कामगारांच्या डोळ्यात आनंद अश्रू आले.या कामगारांसाठी शेवट पर्यंत कामगार सेवक म्हणून अरूण जाधव , गायकवाड, शिळीमकर हे कामगार कामगारांकडून न्यायालयीन लढा देत राहिले असे सांगण्यात आले. त्यांच्या कामाचेही कौतुक कामगारांकडून करण्यात आले.