सध्याच्या स्पर्धात्मक धावपळीच्या विज्ञान युगात लहान मुलांना संगणकाचे ज्ञान अवगत होणे आवश्यक आहे . सर्वच क्षेत्रात संगणकाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.हेच संगणकीय ज्ञान शाळेपासून शाळेतच मुलांना प्राप्त व्हावे याकरिता भोर तालुक्यातील वेळवंड खोऱ्यातील बारे बुद्रुकच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस ग्रामपंचायत सदस्या पूजा अजित तुंगतकर यांच्या विशेष सहकार्याने व मदतीने सेफ एअर इंजिनीअर्स प्राय. लि. पुणे .या कंपनी मार्फत शाळेला ३ संगणक संच ( सुमारे दिड लाख किमतीचे) भेट वस्तू स्वरुपात मिळाले.
या कंपनीच्या वतीने राहुल पाटील आणि हरिवंश शेटे यांनी मुलांना संगणकाची प्राथमिक माहिती देत संगणक कसे हाताळायचे ते सांगितले.यावेळी या शाळेचे मुख्याध्यापक ,शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीमधील सदस्य,गावातील सामाजिक कार्यकर्ते अजित तुंगतकर, अशोक दानवले, संतोष दानवले, ज्येष्ठ ग्रामस्थ नारायण दानवले , विकास सोसायटीचे चेअरमन शंकर दानवले आणि इतर ग्रामस्थ , विद्यार्थी उपस्थित होते. शाळेसाठी भेट वस्तू दिलेल्या कंपनीच्या अधिकाऱ्यांचे व ग्रामपंचायत सदस्य पूजा अजित तुंगतकर यांचे शाळेचे मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समिती यांनी आभार मानले.