भोरः भोर विधानसभेच्या रणांगणात जोरदार शक्तीप्रदर्शासह कुलदीप कोंडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. ते आपल्या भूमिकेवर अढळ असून, त्यांना निवडणूक आयोगाने अॅटो रिक्षा हे निवडणूक चिन्ह बहाल केले आहे. येथील राजा रघुनाथ विद्यालयाच्या मैदानावर कोंडे यांच्या वतीने परिवर्तनाची हाक देत भव्य दिव्य पद्धतीने सभा पार पडली. या सभेच्या माध्यमातून कुलदीप कोंडे यांनी प्रचाराचा शुभारंभ करीत पुढील वाटचालीची माहिती दिली. एकदा मला संधी देऊन बघा, तालुक्याचा कायपालट केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. असे आवाहन कोंडे यांनी या सभेच्या माध्यमातून केले.
१५ वर्षांत तालुक्याचा काय विकास केलाः कुलदीप कोंडे यांचा सवाल
माझा कार्यकर्ता हा माझा श्वास आहे. किती फसवावे, केवळ पैशे नाहीत म्हणून माझी उमेदवारी नाकारली असल्याचा गौप्यस्फोट कोंडे यांनी या सभेच्या माध्यमातून केला. तालुक्यातील लोकाचं माझ्यावर खूप प्रेम आहे, त्यांच्या विश्वासाला तडा जावू देणार नाही. आपली पोरं जर मोठी करायची असेल, तर रिक्षाच्या चिन्हा पुढील बटन दाबण्याचे आवाहन कोंडे यांनी यावेळी केले. निवडणुकीसाठी १५ दिवस शिल्लक राहिलेले आहेत, त्यामुळे शिकारीला निघालेल्या वाघासारखं घराबाहेर पडायचं. आपला विजय निश्चित असल्याचा विश्वास कोंडे यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच जे स्वःताला कार्यसम्राट म्हणवतात त्यांनी १५ वर्षांमध्ये तालुक्याचा काय विकास केला, असा सवाल कोंडे यांनी संग्राम थोपटे यांना केला.
भुलथापांना बळी पडू नकाः कोंडे यांचे आवाहन
त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत कोणत्याही भुलथापांना बळी पडू नका. ते अनेक आश्वासने देतील, त्यांच्या कोणत्याही प्रकारच्या आश्वासनांना बळी पडू, असे आवाहन कोंडे यांनी केले. आम्हाला निष्ठेच्या गोष्टी सांगू नका, तुम्ही आयुष्यभर गद्दारी केली आणि इथल्या जनतेला फसवलं असल्याचा आरोप कोंडे यांनी यावेळी केला.
‘या’ गोष्टी प्राधान्याने सोडविणारः कोंडेंची ग्वाही
महिलांसाठीच्या बचतगटाच्या माध्यमातून महिलांसाठी व्यवसाय उभे करू, कोणताही विद्यार्थ्यी शिक्षणापासून वंचित राहणार नाही याची काळजी घेऊ, तालुक्यातून खेळाडू निर्माण करू, २०२३ साली होणाऱ्या अॅाल्मपिक स्पर्धेत या तालुक्यातील खेळाडू सहभागी होण्यासाठी विडा उचलत असल्याचे त्यांनी सांगितले. एमपीएसची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाच्या पाठीशी उभे राहणार, पाणी, रस्ते, शेती संदर्भातील गोष्टी, वीज आदी गोष्टींसंदर्भात पाठपुरावा करून प्राधान्याने सोडणार असल्याची ग्याही देखील कुलदीप कोंडे यांनी या सभेच्या माध्यमातून दिली. त्यांच्या या सभेला मोठ्या प्रमाणावर महिला सहभागी झाल्या होत्या.