बारामतीः काटेवाडीमध्ये दिवाळी पाडव्याच्या निमित्याने राष्ट्रवादी अजित पवार गटातील पदाधिकारी व कार्यकर्ते अजित पवार यांच्या भेट घेत त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देत आहेत. पुरंदर हवेली मतदार संघातील राष्ट्रवादी अजित पवार यांच्याकडून एबी फॅार्म दाखल केलेले उमेदवार मा. सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे यांनी त्यांच्या समर्थकांसह अजित पवार यांची भेट घेत त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, दादांनी माझ्याबाबतच्या उमेदवारीचा निर्णय करून १५ दिवस झालेले होते. शेवटच्या क्षणी त्यांनी ती (विजय शिवतारे) उमेदवारी आणलेली आहे. त्यांच्या विषयी मी जास्त भाष्य करु शकत नाही. पुरंदर तालुक्यातील तो एक काळा इतिहास आहे, ते एक इतिहासाचे पान असल्याची उपरोधिक टीका झेंडे यांनी विजय शिवतारे यांच्यावर केली.
त्यामुळे मी त्यांच्या बद्दल काही चर्चा करणार नाही. पुरंदर हवेलीची जनता त्यांच्याकडे इतिहास म्हणूनच पाहते. तसेच त्यांचे मानसिक संतुलन बिघडले असल्याची जळमळीत टीकास्त्र झेडेंनी शिवतारे यांच्यावर डागले. त्यांच्या पक्षातील लोकं आम्हाला हे सांगत असल्याचे देखील ते यावेळी म्हणाले. यंदा परिवर्तन होणार असून, दोन्ही उमेदवारांना लोकं कटाळलेली आहेत, असे त्यांनी सांगितले.