जेजुरीः श्री ज्ञानयोग सेवा ट्रस्ट व आम्ही पुणेकर यांच्या वतीने खंडोबा गडावरील कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी फराळाचे वाटप करून त्यांची दिवाळी गोड करण्यात आली.फराळ वाटपाचा कार्यक्रम ज्येष्ठ अभिनेत्री पुष्पा चौधरी यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेेळी मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम खऱ्या अर्थाने आता खुलून दिसत आहे. मंदिरावर विविध उपक्रम नवीन विश्वस्त मंडळाच्या वतीने अतिशय उत्तम पद्धतीने सुरू असल्याचे म्हणत विश्वस्त मंडळाचे कौतुक करीत पुष्पा चौधरी यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
फराळासोबतच महिला, आरोग्य सेविकांना मनिषा खेडेकर यांच्या वतीने दिवाळीची भेट म्हणून साडी देखील देण्यात आली. तसेच संपूर्ण महिन्याचा पगार त्यांनी मंदिर व आरोग्य सेवेतील सेवकांच्यासाठी भेट देऊन त्यांचे दिवंगत सासरे मल्हार भक्त बबन खेडेकर यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी सेवेकरी महिला यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलून आले होते. दोन्ही मंदिरांच्या वतीने विश्वस्त डॉ. राजेंद्र खेडेकर यांनी मंदिरावर सुरू असलेले विविध उपक्रमांची माहिती यावेळी दिली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवसंस्थानचे व्यवस्थापक आशिष बाठे यांनी केले तर आभार प्रदर्शन विश्वस्त ॲड. विश्वास पानसे यांनी मानले. यावेळी बालकलाकार दर्श खेडेकर सह सर्व सेवेकरी काही ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी हेमंत जाधव, अखिल झंझले, सारिका जोशी, दादासाहेब खोमणे, सतीश दोडके, संतोष खोमणे, सचिन लोणकर, ज्योती धमाल यांनी प्रयत्न केले.
दर्शनासाठी आलेले भाविक, प्रामाणिक कष्ट करणारे सेवेकरी यांच्या चेहऱ्यावरील आनंद हीच खरी खंडेराया चरणी सेवा आणि त्यांची सेवा करताना साजरी केलेली दिवाळी ही आमच्यासाठी महत्त्वाची आहे.
– ज्ञानयोग सेवा ट्रस्टच्या अध्यक्षा मनीषा खेडेकर