लोकांच्या आग्रहाखातर , परिवर्तनासाठी विधानसभा अर्ज भरणार- किरण दगडेपाटील
भोरला सध्या विधानसभेची रणधुमाळी सुरू झाली असुन उद्या मंगळवार दि .२२ तारखेपासून विधानसभा नामनिर्देशन उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे . यावेळी राज्यात सर्वत्र महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत होणार आहे. भोरल महाविकास आघाडीकडुन कॉंग्रेसचे आमदार संग्राम थोपटे हे अर्ज भरणार आहेत तर महायुतीतुन अजुनपर्यंत भाजपा, शिवसेना (शिंदे गट पक्ष) राष्ट्रवादी (अजित पवार पक्ष) अशा कोणत्याही पक्षाच्या उमेदवारावर शिक्कामोर्तब झाले नाही . अशात जनसेवक व आधुनिक काळातील जेष्ठ वयोवृद्ध नागरिकांचे व महिलांचे श्रावणबाळ म्हणून ओळखले जाणारे किरण दगडे यांनी मात्र आपण येत्या सोमवारी २८ तारखेला उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
भोर, राजगड (वेल्हा), मुळशीच्या विकासासाठी, जनतेच्या सेवेसाठी, लोकांच्या मागणीनुसार, लोकांच्या आग्रहाखातर मी उमेदवारी अर्ज भरत आहे असे किरण दगडेपाटील यांनी सांगितले. मात्र कोणत्यापक्षाकडुन आपण हा उमेदवारी अर्ज भरणार आहोत हे मात्र अजून गुलदस्त्यातच आहे. आजच्या झालेल्या महायुतीच्या पत्रकार परिषदेत किरण दगडे पाटील व बाळासाहेब चांदेरे यांनी गैरहजेरी लावल्याने जनतेच्या मनात मात्र वेगवेगळ्या शंका कुशंका निघत आहेत. ऐन वेळी फूटा-फूट होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे आता भोर वेल्हा मुळशी विधानसभा रणसंग्रामात संग्राम थोपटे विरोधात किरण दगडेपाटील आणि आणखी कोणी ?? या रणसंग्रामात दुरंगी, तिरंगी कि चौरंगी लढत होणार याकडे सर्व जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.