भोरः राष्ट्रीय महामार्गावर किकवी गावच्या हद्दीत चारचाकी वाहन मुख्य रस्त्याच्या डिव्हायडरच्या मधल्या खड्ड्यात गेल्याने अपघात झाल्याची घटना घडली आहे. राष्ट्रीय महामार्गावरून किकवी गावच्या हद्दीत चारचाकी वाहन साताराहून पुण्याला जात असताना सदर अपघात दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडला असून, या अपघातामध्ये ५ प्रवाशांपैकी दोन जणांना गंभीर दुखापत झाली आहे. या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळत आहे. या अपघाताचे नेमके कारण समजू शकलेले नाही.
घटनेत जखमी झालेल्या व्यक्तींना कीकवी येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हा अपघात झाला असता त्या ठिकाणी बघ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात होती. तर स्थानिक लोकांनी तात्काळ जगद्गुरू नरेंद्रचार्य महाराज नानिजधाम या अँब्युलन्सवरील डायवर अहिरे यांना फोन करताच क्षणाचाही विलंब न लावता अपघातग्रस्त यांना जवळील हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारासाठी नेण्यात आले आहे.