जेजुरीः बिग बॅास सिजन ५ चा विजेता रिल स्टार सूरज चव्हाण याने जेजुरीच्या खंडोबा देवाचे दर्शन घेतले. गाभाऱ्यात गेल्यानंतर सूरज देवाच्या चरणी लीण झाला. यावेळी भंडाऱ्याची मुक्त उधळण करीत येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष त्याने केला. सूरज गडावर दाखल होताच त्याच्या चाहत्यांनी गडावर गर्दी केली होती.
बिग बॅास जिंकल्यानंतर जेजुरीच्या खंडोबा देवाचे दर्शन घेणार असल्याचे सूरजने अगोदरच सांगितले होते. कालाच त्याने सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. आणि आज तो खंडोबा देवाचे दर्शन घेण्यासाठी जेजुरी दाखल झाला होता. सूरज बिग बॅास जिंकल्यावर गावात त्याच्या विजयाचे बॅनर देखील लावण्यात आले आहे. श्री मार्तंड देवसंस्थान तर्फे त्याचा सन्मान करण्यात आला. यावेळी विश्वस्त मंगेश घोणे, पोपटराव खोमणे, विश्वास पानसे उपस्थित होते.