ठाणेः येथील एका ३३ वर्षीय युवकाची प्रेमप्रकरणातून निर्घूणपणे हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. सदर घटना ही शुक्रवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास उजेडात आली. या प्रकरणी मयत युवकाची हत्या त्याच्या एक्स गर्लफेन्ड च्या दुसऱ्या प्रियकराने केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे हत्येसाठी या एक्स गर्लफेन्डने आरोपीला मदत केली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी तरुणीसह तिच्या नव्या प्रियकराला अटक केली आहे. या घटनेत हत्या झालेल्या युवकाचे नाव स्वयम शैलेश परांजपे असून, तो एका बिल्डरचा मुलगा होता.
सपासप ५० वार
या घटनेबाबात अधिकची माहिती अशी की, मयत स्वयम हा त्याच्य एक्स गर्लफेन्डला ब्लॅकमेल करुन तिचे त्याच्याजवळ असलेले फोटो, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत होता. सततच्या त्रासाला तरुणी कंटाळून होती. यामुळे तिने नव्या प्रियकरासह स्वयम याच्या घरी आली. दोघांनी मिळून स्वयमवर कोयत्याने आणि कटरने एकामागून एक असे तब्बल ५० वार केले.
हत्येनंतर मारले सिगारेटचे झुरके
या हत्येनंतर तरुणी आणि तिचा प्रियकर हे दोघेही इमारतीच्या खाली आले. तिथे काही वेळ शांतपणे बसून, सिगारेटचे झुरके घेत पोलिसांची वाट बघत होते. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी दोघेही पोलिसांना शरण जाऊन पोलीस व्हॅनमध्ये बसले. यानंतर पोलिसांनी पंचनामा करुन मयताचा मृतदेह श्वविच्छेदनासाठी पाठवला. तरुणीच्या नव्या प्रेयकराचे नाव मयुरेश नंदू धुमाळ तर त्याची प्रेयसी चेंदणी कोळीवाडा येथे राहत असल्याची माहिती मिळत आहे.
….आणि हत्या करण्याचे ठरले
मयत स्वयम हा तरुणीला सतत ब्लॅकमेल करत असल्याने तरुणीने तिचा नवा प्रियकर मयुरेश धुमाळला याविषयी सांगितले. यानंतर स्वयमला संपवायचं असं ठरवूनच दोघेही त्याचा शोध घेत होते. गुरुवारी रात्री त्यांनी स्वयमला शोधण्याचा प्रयत्न केला. पण तो सापडला नाही. अखेर शेवटी शुक्रवारी सकाळी मयुरेश स्वयमच्या घरी गेला आणि तिथंच त्याची निर्घणपणे हत्या करण्यात आली.