हडपसरः येथील हडपसर परिसरात असलेल्या एका जीममध्ये सफाईचे काम करणाऱ्या महिलला स्टोअरुममध्ये बोलावून तिच्यावर बळजबरीने बलात्कार करुन अत्याचार करतानाचे अश्लील फोटो आरोपीने व्हॅाट्सअॅपवर व्हायरल केले असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आकाश खनपट्टे (वय २५, रा. परभणी) याचा गुन्हा दाखल केला असून, त्याचा पोलीस शोध घेत आहेत. एका २३ वर्षीय महिलेनी या प्रकरणी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील हडपसर परिसरमध्ये एबीएस नावाची जिम आहे. या जिमच्या स्टोअररूमध्ये सुरक्षारक्षक असलेल्या आरोपी आकाश याने महिलेला तिथे बोलवून घेतले. तिथे तिच्यासोबत लगट करून तिच्यावर बलात्कार केला. यावेळी आरोपीने अत्याराचे चित्रीकरण केले. तसेच महिलेला जीवे मारण्याची धमकी देवून महिलेचे फोटो व्हॉट्सअॅपवर व्हायरल केले. गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक निलेश जगदाळे करत आहेत.