वीस हजारांहून अधिक महिला होम मिनिस्टर कार्यक्रमात एकसाथ थिरकल्या गाण्याच्या तालावर
भोरला अनंत निर्मल चॅरीटेबल ट्रस्ट आयोजित तालुकास्तरीय झालेल्या गौरी गणपती सजावट स्पर्धेच्या बक्षीस वितरणाचा व महिलांचा होम मिनिस्टर कार्यक्रम आमदार संग्राम थोपटे व राजगड ज्ञानपीठ मानद सचिव स्वरूपा थोपटे व पृथ्वीराज थोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली अनंतराव थोपटे महाविद्यालय मैदानावर रविवार सुट्टीच्या दिवशी (दि२९) पार पडला. यावेळी खासदार संसदरत्न सुप्रिया सुळे, कॉंग्रेसच्या महिला आघाडी अध्यक्षा संध्या सव्वा लाखे शरद पवार राष्ट्रवादीच्या पक्षाच्या माजी जि.प.सदस्य वंदना धुमाळ, गीतांजली शेटे,माजी नगराध्यक्षा तृप्ती किरवे, हसिना शेख कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष शैलेश सोनवणे, बाळासाहेब थोपटे, अनिल सावले, महेश टापरे, गणेश खुटवड, रविंद्र बांदल, संदिप नांगरे, उत्तम थोपटे, विठ्ठल आवाळे, प्राचार्य प्रसन्न कुमार देशमुख, अभिजित येलगुडे, दिपक कुमकर, सुभाष कोंढाळकर असे कॉंग्रेसचे व शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी गौरी गणपती सजावट देखावा स्पर्धेचे प्रथम क्रमांकाचे ज्युपिटर गाडीचे पारितोषिक हातनोशी(ता.भोर) लता सुर्यकांत गरुड यांच्या जागरण गोंधळ या देखाव्याला मिळाले. दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक वॉशिंग मशीन शिवाजी नारायण इंगुळकर (देखावा -आनंदाश्रम पालखी सोहळा) तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक फ्रिज त्रिकोणी गणेश मालुसरे(देखावा -जेजुरीगड) चौथ्या क्रमांकाचे पारितोषिक साक्षी दिलीप खोपडे(देखावा -आनंदाश्रम पालखी सोहळा)व पाचव्या क्रमांकाचे पारितोषिक टि व्ही पार्थ सदाशिव खोपडे (देखावा -केदारनाथ) यांना मिळाले अशी २१ क्रमांकाची बक्षिसे सुप्रिया सुळे, आमदार संग्राम थोपटे, स्वरूपा थोपटे,संध्या सव्वा लाखे यांच्या हस्ते विजेत्यांना प्रदान करण्यात आलीत .
होम मिनिस्टर या कार्यक्रमात महिलांनी मोठा सहभाग नोंदवत धमाल उडवून कार्यक्रमाला मोठी रंगत आणली. यामध्ये होम मिनिस्टरच्या प्रथम क्रमांकाच्या मानकरी ठरल्या मोहरी (ता.भोर ) येथील पूनम सुभाष लेकावळे यांना फ्रिज मिळाला, दुसरा क्रमांक एल ई डि टि व्ही प्रमिला रमेश सोनवणे न्हावी(ता.भोर)व तृतीय क्रमांक पिठाची गिरणी नैना सुनिल पवार रा. देगाव यांना बक्षीस मिळाली. तसेच ५१ लकी ड्रॉ कूपन पध्दतीने मोबाईल, मिक्सर, कूकर, इस्त्री,डिनर सेट अशी बक्षिसे महिलांना मिळाली.आलेल्या सर्व महिलांना आकर्षक भेटवस्तू साडी देण्यात आली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र शेटे यांनी केले.
आमदार थोपटे यांनी महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून हा क्षण सुवर्ण अक्षरांनी लिहीला जाईल असे सांगितले तर सुप्रिया सुळे यांनी महागाई, रोजगार, महिलांच्या समस्या विषयी महायुती सरकार जोरदार टिका केली.अनंतराव थोपटेंना तुम जियो हजारो साल असे सर्व महिलांच्या वतीने शुभाशीर्वाद, शुभेच्छा दिल्या. सव्वालाखे यांनी आमदार संग्राम थोपटे यांना एकमेव निष्ठावंत आमदार म्हणून संबोधले.