पुणेः शहरातील मार्केटयार्ड परिसरात अनैतिक संबंधामध्ये आजारी पतीला प्रियकराच्या साथीने गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सुरुवातीला या प्रकरणात पतीला मधूमेह आणि मणक्याच्या आजार असल्याने त्यांनी स्वःताह आत्महत्या केल्याचे पत्नीने सांगितले होते. मात्र, मयत व्यक्तीचे श्वविच्छेदन अहवाल पोलिसांना मिळाल्यानंतर मयताने आत्महत्या केली नसून त्याचा गळा दाबून खून केल्याची माहिती डॅाक्टरांनी दिली. त्यानुसार पोलिसांनी या घटनेचा तपास केल्यानंतर मयत व्यक्तीच्या पतीनेच प्रियकराच्या साथीने पतीची गळा दाबून खून केल्याचे कबुल केले. भारती विद्यापीठ पोलिसांनी महिलेसह तिच्या प्रियकराला अटक केली आहे.
…..आणि अशाप्रकारे केला आत्महत्येचा बनाव
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोपीनाथ इंगुळकर (वय ३७, रा. दुगड शाळेजवळ, सच्चाई माता मंदिराजवळ, कात्रज) असे खून झालेल्याचे नाव आहे. भारती विद्यापीठ पोलिसांनी राणी इंगुळकर (वय ३२, रा. कात्रज) आणि नितीन ठाकर (४५, रा. वेल्हे) यांना अटक केली आहे. मयत गोपीनाथ हे मार्केड यार्डात हमालीचे काम करीत होते. त्यांना मधूमेह आणि मणक्याचा आजार जडला होता. २३ सप्टेंबरला राणीने गोपीनाथ यांचा भाऊ संभाजी यांना फोन करुन गोपीनाथ बेशुद्धावस्थेत पडल्याचे सांगितले. तसेच गोपीनाथ यांनी आजारपणाला कंटाळून स्वःताचा गळा दाबून आत्महत्या केल्याचे संभाजी यांना सांगितले.
प्रियकराच्या साथीने केला पतीचा खून
यानंतर संभाजी यांनी गोपीनाथ यांना रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. शवविच्छेदन अहवालात गोपीनाथ यांचा मृत्यू गळा दाबून झाला असल्याचे डॅाक्टरांनी सांगितले. त्यानंतर पोलिसांनी राणीकडे चौकशी केली असता तिने ‘त्यांनी माझा हात हातात घेऊन स्वतःचा गळा दाबून घेऊन आत्महत्या केली असल्याचे सांगितले. परंतु पोलिसांनी तिच्याकडे अधिक चौकशी केली असता प्रियकराला घरी बोलावून पतीचा गळा दाबून खून केला असल्याची कबुली दिली.
मुलीसमोरच जन्मदात्या पित्याची हत्या
गोपीनाथचा यांचा खून त्यांची दहा वर्षांची मुलसमोर झाला असल्याची माहिती आहे. ज्यावेळी हा प्रकार घडत होता, त्यावेळी ती खूप घाबरली आणि स्वयंपाक घरात जाऊन लपून बसली.