जिल्हा स्तरावरील शालेय कुस्ती स्पर्धा
पुणे जिल्हा स्तरीय कुस्ती स्पर्धा २०२४ ही संतोषआप्पा दसवडकर (राजगड/वेल्हा) यांच्या राजतोरण कुस्ती संकुल विंजर ( राजगड/वेल्हा) येथे पार पडल्या . शालेय जिल्हा स्तरावरील कुस्ती स्पर्धेत पै.अनुष्का खोपडे (आंबाडे), साक्षी बळे, सई भेलके(भोर) , पूर्वा शिवतरे, वैष्णवी मरगजे यांचा प्रथम क्रमांक आल्याने त्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे तर द्वितीय क्रमांक कादंबरी शेटे ,जानकी भालेघरे, दर्शना म्हस्के (नेरे) ता.भोर , दिशा खोपडे , शुभ्रा गुठाळकर यांचा तृतीय क्रमांक आला. धनश्री आवारे यांना उत्तेजनार्थ म्हणून बक्षीस मिळाले.तालुक्यातून या महिला पैलवान रणरागिनी मुलींचे मोठे कौतुक होत असुन त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
भोर येथील जवाहर कुस्ती संकुलामध्ये कुस्ती प्रशिक्षण घेत असलेल्या महिला पैलवानांनी जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत घवघवीत यश मिळवल्यामुळे त्यांचे विद्यालयातील शिक्षक, विद्यार्थ्यांकडून तसेच तालुक्यातील पैलवान संघटनांकडून कौतुक होत आहे. महिला पहिलवान मुलींनी भोर तालुक्याचे जिल्हास्तरावर मोठे नाव कमावल्याने या महिला पैलवानांचे स्थान उंचावले आहे.
यावेळी स्पर्धेसाठी पै.सचिन मरगजे, पै.सागर शेटे, राजेंद्र वरे, पै.संजय भेलके, शशिकांत खोपडे, जिल्हा पत्रकार संघ उपाध्यक्ष संतोष म्हस्के, क्रिडा शिक्षक कोच अमित म्हस्के, कुमार शिवतरे, योगेश गुठाळकर, आप्पा खोपडे, धोंडीराम बळे, कुमार शिवतरे हे भोर मधील नागरिक उपस्थित होते.