जिल्हा स्तरावरील रायफल शूटिंग स्पर्धा
भोर तालुक्यातील क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालय रावडी (ता.भोर) येथील विद्यार्थी स्वराज मंगेश धावले(रा.कर्नावड) याने शिरूर येथे झालेल्या जिल्हास्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावित घवघवीत यश संपादन केले. तो विद्यार्थी इयत्ता सातवी मध्ये शिकत आहे.
या खेळाची तालुक्यामध्ये कोणतीही पार्श्वभूमी नसताना या खेळाची तयारी स्वराजने केली. या खेळाची तयारी करत असताना भोर तालुक्यामध्ये कुठेही शूटिंग रेंज उपलब्ध नाही. या विद्यार्थ्यांनी या खेळाचे प्रॅक्टिस सराव झाडाच्या खोडामध्ये टारगेट लावून केला .
या खेळासाठी क्रांतिवीर फडके विद्यालयाचे क्रीडा शिक्षक गोरखनाथ अधिकारी यांचे सहकार्य मोलाचे ठरले त्याचबरोबर प्रा. साबळे सर ,प्रा. कुडपणे सर यांचे सहकार्य लाभले.या विद्यार्थ्यांनी या खेळामध्ये सहभागी होऊन भोर तालुक्यामध्ये एका नवीन खेळाचा पायंडा पाडला आहे. या खेळाडूसाठी तालुक्यातून शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे.यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. उदय जोशी , अमोल जोशी ,मुख्याध्यापक रवींद्र पवार, रावडी पंचक्रोशीतील सरपंच आणि नागरिकांनी स्वराजच्या यशासाठी त्याचे कौतुक केले आणि पुढील विभाग स्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या .