राजगडः हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी राजधानी ‘किल्ले राजगड’वरून स्वराज्य चा कारभार पाहिला. अशा या राजगड किल्लाची स्वच्छता व पदभ्रंमती मोहीम शिलेदार वीर कान्होजीराजे जेधे प्रतिष्ठान, पुणे यांच्या वतीने २२ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती. या मोहिमेमध्ये प्रथम हिंदवी स्वराज्य शपथ दिनाच्या निमिताने १९४७ रोजी उभारण्यात आलेल्या चेलाडी येथिल ‘स्वराज्य स्तंभ’ चा परिसर स्वच्छ करून या स्तंभाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पत्नी व छत्रपती संभाजी महाराजांच्या मातोश्री राणी सईबाई यांची समाधी व जवळचा परीसर सर्व शिवभक्तांनी स्वच्छ करण्यात आला.
समाधीच्या जीर्णाेध्दाराची मागणी
तेथे शिवव्याखाते बालाजी काशीद यांनी महाराणी सईबाई चा इतिहास अतिशय मोजक्या शब्दांत उपस्थित असणाऱ्या सांगितला. हि समाधी अध्याप ही दुर्लक्षित आहे, या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे बांधकाम झालेले नाही. अशा या दुर्लक्षित समाधीचा चांगल्या प्रकारे जिर्णोद्धार व्हावा, अशी मागणी अनेक शिवभक्तांनी केली. तसेच प्रतिष्ठानच्या तर्फे किल्ले राजगडवर भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
भावनिक प्रसंगात सारे दंग
किल्ल्यावर व्याख्यान करताना बालाजी काशीद यांनी राजगड किल्ला या विषयावर व्याख्यान दिले. डोळ्यांतून अक्षरशा अश्रू आणणारी माहीती त्यांनी यावेळी सांगितली. ते म्हणाले ‘ राजगडा आज तुला काय तरी सागायचयं ज्या वादळाला हिंन्दुस्थानातील कोणतीच शक्ती रोखू शकली नाही, ते वादळ तुझ्या सामर्थ्यवान कुशीत जपलेस, तुझ्या अभेद्य कड्यांच्या भरवश्यावर शतकानुशतके अनेक जन दंग झाले, अरे यवडच काय आमच्या काळजातील काळजाला तु लेकरासारख अंगाखांद्यावर खेळवलस, राजगडा ऐक ना आम्हा शिवभक्तचे तुझावर खुप प्रेम आहे रे, राजगडा तु कीती भाग्यवान, तु तो निश्चयाचा महामेरू पाहिलास त्या श्रीमंतयोगी राजाचे तुला अनेकवार दर्शन घडले, तु राजांचे हसणे पाहिलस तु राजांचे रडणे पाहिलेस माझा राजाला स्वराज्यचा कारभार करण्यासाठी २५ वर्ष साथ दिलीस राजगडा! असे खुप भावनिक प्रसंग बालाजी काशीद यांनी आपल्या व्याख्यानात सांगितले.
त्याचबरोबर शिवव्याखाते शंभूराज्याभिषेक सोहळ्याचे अध्यक्ष शेखर पाटील यांनी देखिल छत्रपती संभाजी महाराज आणि राजगड या विषयावर माहिती आलेल्या सर्व शिवभक्त मावळ्यांना दिली. यावेळी प्रतिष्ठानच्या वतीने या मोहिमेत सहभागी झालेल्या सर्व शिवभक्तांचा सन्मान राजगडाच्या सदरेवर करण्यात आला.
या मोहिमेत शिलेदार वीर कान्होजीराजे जेधे प्रतिष्ठानचे संचालक शंकरराव चिकणे, रमेश जेधे, सुशिल जेधे, सिताराम फाटक, विनोद ढमढेरे, दिप जेधे, संजय भोसले तसेच चेतन पाटील, निशिकांत वानखडे, अतिश मोहिते, रामदास कोचळे, नितीनदादा कुडले, अशोक देवघरे, प्रसाद कुलकर्णी, राहूल मुंगळे, दिलीप पासलकर, शुभम मारणे, अमोल भिलारे, रमेश धोंडे, ऋषीकेश पासलकर, व्यंकटेश वाघमारे, पांडूरंग चोरगे, अभिजीत कदम अनेक शिवभक्त आणि विविध शिवभक्त संघटनांनी उस्फूर्त सहभाग घेऊन मोहिमेची शोभा वाढवली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल (बापू) जेधे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रतिष्ठानचे संचालक गिरीश धोंडे आणि उमेश पारठे यांनी मानले.