उरुळी कांचन: लोणीकंद येथील सुभद्राताई भूमकर विद्यालयात तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा नुकत्याच पार पडल्या. या स्पर्धेत तालुक्यातील शेकडो संघांनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेत डॅा. सायरस पुनावाला इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले असून, अजिंक्य पद पटकावले आहे. त्यामुळे विजेत्या खेळाडूंचे व शाळेचे उरुळी कांचन व परिसरातील नागरिकांकडून भरभरून कौतुक करण्यात येत आहे.
या स्पर्धेत डॉ. सायरस पुनावाला इंग्लिश मीडियम स्कूलच्या १७ वर्ष वयोगटातील मुलांचा अंतिम सामना वाडे बोल्हाई येथील श्री जोगेश्वरी माता विद्यालय यांच्याशी झाला. या सामन्यात विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दणदणीत विजय मिळवित जिल्हा स्तरावरील स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. 17 वर्ष वयोगटातील विजयी संघामध्ये सुजल कांचन, साई कांचन, हर्षवर्धन कोळपे, शुभांशू जाधव, शौर्य टिळेकर,अथर्व कांचन, यश शितोळे, रितेश जगताप, आर्यन चौधरी, राज कांबळे या खेळाडूंचा सहभाग होता.
तसेच विद्यालयाच्या 14 वय वर्षे वयोगटातील मुलांनी सुद्धा कबड्डी स्पर्धेमध्ये तिसरा क्रमांक मिळविला असून, या संघामध्ये वेदांत बोरकर, वेदांत सूर्यवंशी, सक्षम चौधरी, सिद्धेश जाधव, आविष्कार टिळेकर, अथर्व चौधरी, हेमल तमांग, आदित्य कुमार, शिवम कुमार, श्लोक सुंदरानी या विद्यार्थ्यांचा सहभाग होता. या यशस्वी विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक राजेंद्र चंद,आशिष क्षीरसागर, साक्षी धुमाळ यांचे मार्गदर्शन मिळाले. विजेते खेळाडू व मार्गदर्शक शिक्षक यांचे विद्यालयाच्या वतीने प्राचार्य राजकुमारी लक्ष्मी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
बॅाक्सिंगमध्ये देखील उत्तुंग भरारी
डॉ. सायरस पूनावाला इंग्लिश मीडियम स्कूल (CBSE) क्लस्टर (IX) साऊथ झोनमधील बॉक्सिंग स्पर्धेमध्ये देखील उत्तुंग यश संपादन केले आहे. कोल्हापूर येथे येथील संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलमध्ये CBSE क्लस्टर (IX) स्पर्धा पार पडली. साऊथ झोन मधील 14 वय वर्षे गटातील बॉक्सिंग स्पर्धेमध्ये यशराज सचिन बडेकर या विद्यार्थ्याने द्वितीय क्रमांक (रौप्यपदक) मिळवून राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. पुढील राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा हरियाणा या ठिकाणी होणार आहे.