सारोळे: येथील राजापुर गावात गणेशोत्सवानिमित्ताने ग्रामस्थांनी महिला मंडळींसाठी खेळ पैठणीचा कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन राजापूर गावचे सरपंच बाळासाहेब बोबडे, हर्षद बोबडे, महेश बोबडे, शांताराम खुटवड यांनी केले. खेळ पैठणीच्या कार्यक्रमाला महिलांना उस्फुर्त प्रतिसाद दिला. एकूण चार फेऱ्या घेण्यात आल्या. त्यातील तीन फेऱ्यांना बक्षीस पहिल्या आणि दुसऱ्या नंबरसाठी पैठणी साड्यांचे वाटप करण्यात आले. राजापुर गावातील 150 ते 200 महिलांनी यावेळी सहभाग नोंदविला होता. लहान मुले, मुली तसेच युवक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लहान मुलांसाठी चमचा-लिंबू, खेळ ठेवण्यात आले होते. महिलांसाठी संगीत खुर्ची आदी खेळ ठेवण्यात आले होते. यामधून विजयाचे पहिल्या नंबरच्या मानकरी रूतुजा गउडगउडए ठरल्या. पैठणी जिंकलेल्या महिलांचे विशेषतः कौतुक करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्या शलाका कोंडे उपस्थित होत्या. त्यांनीही महिलांसोबत संगीत खुर्ची खेळण्याचा आनंद घेतला. या स्पर्धांचे सादरीकरण (सुत्रसंचलन) हर्षद बोबडे सर यांनी केले.