भोरः गणेशाच्या आगमनानंतर काही दिवसांत गौरीची प्रतिष्ठापणा करण्यात येत असते. यासाठी गौरी आणि गणपतीसाठी वेगवेगळ्या प्रकारची आरास करण्यात येते. गौरी पुजनानिमित्ताने शहरातील भोईआळी येथील सिमा भडाळे यांनी गौराईला सुंदर पद्धतीने घाणाची आरास केली आहे. ही आरास पाहण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातील नागरिक त्यांच्या घरी येत आहेत. खरतर लोप पावत चाललेल्या घाणा संस्कृतीला या निमित्ताने उजाळा मिळाला आहे.
भडाळे यांनी गौरी समोर आरास म्हणून लोप पावत चाललेली लग्नाच्या समारंभातील घाणा संस्कृती मांडली केली आहे. भारतीय हिंदू संस्कृतीमध्ये सोळा संस्कारांमधील पंधरावा लग्न संस्कार महत्त्वाचा मानला जातो. विवाहापूर्वी मुहूर्त करणे, हळकुंड फोडणे,असे काही विधी घरातील महिला करतात. लग्नाच्या आधी हळद लावणे, घाणा भरणे, ग्रहमख असे विधी करण्याची प्रथा आपल्याकडे आहे.
विवाह संस्कारात गणपती पूजन, कुलदेवता पूजन, मधुपर्क, संकल्प, कन्यादान किंवा स्वयंवर,अक्षतारोपण, मंगलसूत्र बंधन, पाणिग्रहण, होम, लाजाहोम, अश्मारोहण, सप्तपदी, अभिषेक, कर्मसमाप्ती, मंगलाष्टके असे विधी होतात. लग्नविधीमध्ये मांडव पूजन, देवक बांधणे, चुडा भरणे, घाणा असे विधी केले जातात.
ग्रामीण भागात हे विधी आजही हे विधी मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. पण शहरी भागात याचे प्रमाण कमी झाले आहे. घाणा पुजनात सुवासिनी जात्याचे पूजन करून पारंपरिक गिते गातात. नवरानवरीची हळद दळली जाते. लग्नाच्या घाण्याचा कित्येक वर्षापासुन चालत आलेली लग्न समारंभातील पारंपरिक लोप पावलेली घाणा नवरीला चुडा बांगडया भरताना हळद दळताना धान्य निवडणे हे दाखवले, यामुळे देखाव्याच्या माध्यमातून जुन्या आठवणीना उजाळा देण्याचा प्रयत्न केल्याचे सिमा भडाळे यांनी सांगितले.