जेजुरीः येथील विद्यानगर परिसरातील मानव विकास प्रतिष्ठान संचलित श्री दत्त मित्र मंडळ, ट्रस्ट हे गेल्या ८ वर्षांपासून समाजिक उपक्रम तसेच गणेशोत्सवा दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन करीत असते. यावर्षी देखील मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, त्यातील नृत्यू स्पर्धा मोठ्या जल्लोषात पार पडल्या. या नृत्यू स्पर्धेत परिसरातील चिमुकल्यांनी सहभाग घेत आपाला नृत्याविष्कार सादर करुन प्रेक्षकांची मने जिंकली. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने परिसरातील नागरिकांनी हजेरी लावली होती.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे सर लाभले होते. तर कार्यक्रमाचे उद्घाटन पुरंदर तालुका आरपीआयचे अध्यक्ष गौतम भालेराव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर मार्तंड देवसंस्थानचे विश्वस्त मंगेश घोणे, पुणे जिल्हा दुध संघाचे संचालक तानाजी जगताप, शिवसेना शहरप्रमुख विठ्ठल सोनवणे, भाजपचे सचिन पेशवे, युवा सरपंच संदीप यादव, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सनी झगडे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक मानव विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष अड. धनंजय भोईटे यांनी केले. तर सूत्रसंचालन रुपाली कड यांनी केले व आभार प्रदर्शन श्री दत्त मित्र मंडळाचे संस्थापक अड. अजय देवकर यांनी मानले.
संयोजकांनी खूप चांगल्या प्रकारे कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल मानवरांनी त्यांचे कौतुक करीत चिमुकल्यांनी केलेल्या नृत्यांची प्रशंसा केली. चिमुकल्यांनी सादर केलेल्या नृत्याविष्कारास प्रेषकांनी टाळ्यांच्या माध्यमातून दाद दिली.
‘त्या’ नृत्याविष्काराने सारे झाले स्तब्ध
देशात आणि राज्यात मुली व महिलांवरील अत्याचाऱ्याच्या घटनेमुळे एक प्रकारची संतापाची लाट उसळली असून, त्याची तीव्रता कोलकत्ता आणि बदलापूर या घटनेमुळे अधिक झाल्याचे आपल्याला पाहिला मिळाले होते. या घटनांवर आधारित मुलींनी मिळून नृत्यअविषकार सादर करुन सगळ्यांनाच स्तब्ध केले. त्यांच्या सादरीकरणामुळे अनेकजण भावूक झाले होते. तर काही वेळ निरव शांतता पसरली होती.