राजगडः तालुक्यातील विविध विकासकामांच्या अनुषंगाने कार्यक्रामाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात या विधानसभा क्षेत्राचे आमदार संग्राम थोपटे यांनी अनेक गोष्टींचा पाढाच यावेळी वाचला. महाविकास आघाडीचे सरकार राज्यात असताना त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते, त्यांच्या नेतृत्वात काम केले. त्यावेळी सरकारमध्ये अशोक चव्हाण हे सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. त्यावेळेस वेल्ह्याच्या शासकीय इमारतीच्या बांधकामाला मंजूरी मिळाली होती. मात्र, चंद्रकांत पाटील (chandrakant patil) जिल्ह्याचे पालक मंत्री असताना हे काम पुढे जात नव्हते, असल्याचे सांगत मागच्या जिल्हा नियोजन समितीच्या मीटिंगमध्ये हाच मुद्दा पालकमंत्र्यांसमोर मांडला आणि कामाला सुरूवात झाली असल्याचे यावेळी बोलताना आ. संग्राम थोपटे यांनी सांगितले.
अजित दादांच्यामुळे हे कामं मंजूर झाले आहे, आमदार आणि खासदारांमुळे नाही असा दावा त्यांच्या पक्षातील एकाने केला, 2019 पासून तुमचे दादा पालकमंत्री होते तेव्हा तुमचे हाथ बांधले होते का? असा सवाल टीका करणाऱ्यांना थोपटे यांनी विचारला आहे. श्रेय घेण्यासाठी चालू आहे सगळं इमारतीच्या बांधकाम मंजूरीवरून अजित पवार गट आणि महाविकास आघाडीतली श्रेयवादाची लढाई समोर आल्याचे सांगितले गेले. राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फोडून आव्हान देण्याचा प्रयत्न त्यांनी केला, पण लोकसभा निवडणूकीत जनतेने त्यांना जागा दाखवून दिली असल्याची बोचरी टीका थोपटे यांनी सत्ताधाऱ्यांंवर केली. तसेच भोर, वेल्हा, मुळशीतले मावळे कधी विकले जाणार नसल्याची स्पष्टोक्ती त्यांनी केली.
आचार संहिता लागण्याअगोदर महाड रस्त्यासाठी निधी आणायचायः आ. संग्राम थोपटे
येत्या 15 ते 20 दिवसांत आचार संहिता लागेल, त्याआधी महाड रस्त्यासाठी जास्तीत जास्त निधी आणायचा आहे. काही जण या कार्यक्रमावर प्रोटोकॉल सांगून अक्कल शिकवत आहेत, या कार्यक्रमाला परवानगी नाही असे म्हणत आहेत, हा राजकीय कार्यक्रम शासकीय नाही. तुम्ही कार्यक्रम घेताना आमदार खासदारांचे नावं टाकता का? कामावरून पुन्हा स्थानिक नेत्यांची श्रेयवादाची लढाई समोर आली आहे. यावेळेस सुप्रिया सुळे यांच्यावर कमी आणि माझ्यावर जास्त टीका होत असल्याचे म्हणत बहुतेक मी ताईंसाठी जास्त कामं केले म्हणून माझ्यावर जास्त टीका होत असल्याचे त्यांनी सांगितले.