निराः येथील दर बुधवारी असणारा आठवडे बाजार निरा-लोणंद रस्त्याच्या एका बाजूला भरत आहे. ग्रामसभेत वेळोवेळी ही गोष्ट निदर्शनास आणून देखील संबधितांना सूचना केल्या असे सांगण्यात आले. प्रत्यक्षात मात्र बाजार येथे भरतच असल्याचे दिसत आहे. निरा गावातून लोणंदच्या दिशेने रस्ता जातो, या रस्त्यावच्या बाजूलाच भाजी विक्रेते बसत आहे. हा रस्ता सतत वाहता असल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतूक या रस्त्यावरुन होत असते. यामुळे अपघात देखील घडू शकतो. पण याकडे सर्रास दुर्लक्ष केले जात असल्याचे बोलले जात आहे.
निरा शिवतक्रार गावची या अनुषंगाने ग्रामसभा पार पडली. या ग्रामसभेत याबाबत विनंती करण्यात आली की, बुधवारचा आठवडे बाजार रस्त्यावर भरवू नये, याबाबत ठेकेदाराला सूचना देण्याचे आश्वासन मिळाले. सूचना देवून देखील ठेकेदार याकडे दुर्लक्ष करीत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने डेंग्यू, चिकूनगुनियाने येथील नागरिक बेजार झालेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये बाजार खरेदीसाठी आलेल्या लोकांना रस्ता ओलांडता मोठी कसरत करण्याची वेळ आली आहे.
शाळेतील मुले आपला जीव मुठीत धरून रस्त्याने ये-जा करीत आहेत. रस्त्यावरुन वाहन चालकांना देखील मोठी कसरत करीत वाहन चालविण्याची वेळ आली आहे. ॲम्बुलन्सला रस्ता मिळेना अशी स्थिती येथे निर्माण झाली आहे. दर बुधवारी अशीच परिस्थिती येथे पाहिला मिळत असल्याची माहिती येथील नागिरकांनी दिली. एखादे ब्रेक फेल झालेले वाहन गर्दीत घुसली तर…..बाजारकर ठेकेदार ग्रामपंचायतच्या आदेशालाच वाटाण्याच्या अक्षता लावत असेल तर केविलवाण्या जनतेचे काय? असा प्रश्न नागिरक विचारत आहे.
रस्त्यावर बाजार भरवून नका, जी जागा पंचयातीची आहे त्या ठिकाणी बाजार भरवावा. याचे कारण म्हणजे निरा-लोणंद या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहने ये-जा करीत असतात. तसेच शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना आपला जीव मुठीत घेऊन रस्त्यावरुन जावे लागते. चुकून एखाद्या वाहनाचा ब्रेक फेल झाल्यास आणि अपघात घडल्यास त्याला जबाबदार कोण?
तुळशीराम कृष्णराव जगताप (सेवानिवृत्त पोलीस)
याबाबत पंचायतीचे उपसरपंच यांच्याशी संपर्क केला असता प्रतिसाद मिळाला नाही.