भोरः प्रतिनिधी कुंदन झांजले
गणेशोत्सव येणाऱ्या ७ सप्टेंबरला असून हा गणेशोत्सव तालुक्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील सर्व गणेश मंडळांनी प्रशासनाला सहकार्य करत निर्विघ्नपणे व शांततेत पार पाडण्याचे आवाहन भोरचे उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात व तहसीलदार राजेंद्र नजन यांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आढावा बैठकीत केले.
भोर तालुक्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील सर्वच गणेश मंडळांची भोर येथील सह्याद्री मंगल कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी मागील वर्षी प्रशासनास सहकार्य केलेल्या, आदर्श कार्य केलेल्या पोलीस पाटील, गणेशोत्सव मंडळांचा, आपत्ती व्यवस्थापन भोईराज पथकाचा, पोलीस मित्र यांचा विशेष सन्मान प्रशस्तीपत्र देऊन करण्यात आला.
तसेच सामाजिक, आरोग्य, शैक्षणिक क्षेत्रात जनसामान्यांसाठी नेहमी झटणाऱ्या मदर करणा-या राजीव केळकर यांना देखील विशेष सन्मान देऊन गौरव करण्यात आला. यावेळी भोर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब पवार, उपनिरीक्षक अनिल चव्हाण, गोपनीय विभागाचे पोलीस अभय बर्गे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अशोक खुटवड, भोर नगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे अधिकारी महेंद्र बांदल विविध गावचे महिला, पुरुष, पोलीस पाटील, गणेश मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि पत्रकार उपस्थित होते.