Thursday, July 16, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

समस्या: महावितरणापुढे पुणे महानगरपालिका हतबल; कायस्वरुपी उपाययोजना करण्याच्या मागणीला केराची टोपली

ट्रान्सफॅार्मरमध्ये होतोय सातत्याने बिघाड: शहरातील पाणीपुरठा होतोय विस्कळित, नागरिकांचा महापालिकेवर रोष

by SBPRNL
August 29, 2024

पुणेः प्रतिनिधी वर्षा काळे 

महापालिकेकडून पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलकेंद्रातील वीजपुरवठा सातत्याने खंडित होत असल्याने पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. जलकेंद्रातील महावितरणाच्या ट्रान्सफाॅर्मरमध्ये सातत्याने बिघाड होत असून, या संदर्भात कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात या महापालिकेच्या पत्रव्यवहाराला महावितरणकडून केराची टोपली दाखविली जात आहे. त्यामुळे महावितरणापुढे महापालिका हतबल ठरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

संतोष ट्रेडर्स फलटण यांच्याकडून दिवळे येथील व्यावसायिकाची तब्बल १ कोटी २६ लाखांची फसवणूक; बनावट ट्रक क्रमांकांचा वापर,

पुणे शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी खडकवासला धरण साखळी प्रकल्पातून महापालिका प्रतिदिन पाणी घेते. हे पाणी सिंहगड रस्त्यावरील मुख्य जलकेंद्रात येते, त्यानंतर संपूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर पर्वती, खडकवासला, पद्मावती, वारजे, लष्कर, चतु:शृंगी, एसएनडीटी अशा प्रमुख जलकेंद्रांतून शहराच्या विविध भागाला पाणीपुरवठा केला जातो.

सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने शहरात जोरदार पाऊस सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याचा परिणाम विद्युत पुरवठ्यावर होत आहे. पाणीपुरवठा करण्यासाठी जलकेंद्रात महावितरणने ट्रान्सफाॅर्मर बसविली आहेत. त्यामध्ये सातत्याने बिघाड होत असून, कधी ट्रान्सफाॅर्मरमध्ये बिघाड होणे, तर केबल तुटणे यामुळे जलकेंद्राचा वीजपुरवठा सातत्याने काही काळ खंडित राहतो. अशा कारणांमुळे पंपिंग स्टेशनचे काम बंद पडत आहे. त्यामुळे काही भागाला पाणीपुरवठा करण्यास अडचणी येत आहेत. पाणीपुरवठा बंद झाल्यानंतर नागरिकांच्या रोषालाही महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सामोरे जावे लागत आहे.जलकेंद्रातील बिघाडामुळे नियमित वेळेत पाणीपुरवठा होऊ शकला नाही. काही भागात उशिरा पाणी आल्याने नागरिकांची गैरसोय झाली. ऐन पावसाळ्यात आणि धरणे तुडुंब भरलेली असतानाही या प्रकाराला सामोरे जावे लागत असल्याची वस्तुस्थिती पुणे शहरात पाहिला मिळत आहे.

Tags: mahavitaranPunepunemahapalikarajgadnews
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
संतोष ट्रेडर्स फलटण यांच्याकडून दिवळे येथील व्यावसायिकाची तब्बल १ कोटी २६ लाखांची फसवणूक; बनावट ट्रक क्रमांकांचा वापर,
क्राईम

संतोष ट्रेडर्स फलटण यांच्याकडून दिवळे येथील व्यावसायिकाची तब्बल १ कोटी २६ लाखांची फसवणूक; बनावट ट्रक क्रमांकांचा वापर,

July 18, 2025
पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची नवी प्रभाग रचना आज जाहीर होणार
पुणे

पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची नवी प्रभाग रचना आज जाहीर होणार

July 14, 2025
ताज्या बातम्या

Rajgad News बातमी इफेक्ट- भोलावडेच्या पृथ्वीराज पेट्रोल पंपाजवळच्या रस्त्यावरील खड्डा बुजविला 

June 26, 2025
8 मुलींच्या विनयभंग प्रकरणातील शिक्षकास अटींवर जामीन मंजूर
क्राईम

8 मुलींच्या विनयभंग प्रकरणातील शिक्षकास अटींवर जामीन मंजूर

February 15, 2025
Next Post

पर्यटनः वरंधा आणि नीरा देवघर येथील धबधब्यांवर 'सेल्फी पॅाईंट'; शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून मंजूरी

ताज्या बातम्या

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

July 10, 2026
संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

July 8, 2026
शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

July 4, 2026
भोरच्या राष्ट्रवादीच्या सभापतींवर निधी वाटपात पक्षपातीपणाचा आरोप; सदस्यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा

भोरच्या राष्ट्रवादीच्या सभापतींवर निधी वाटपात पक्षपातीपणाचा आरोप; सदस्यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा

July 3, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group