सासवडः प्रतिनिधी खंडू जाधव
गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या पुरंदरमधील नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्य हस्ते करण्यात आले. राज्य शासनाच्या विविध योजना मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर कार्यक्रम राबवत आहोत. हा उद्घाटनाचा कार्यक्रम साध्या पद्धतीने व लवकर घेण्यात आला. कोणत्याही कामात हलगर्जीपणा राहता कामा नये, जे प्रमुख लोक जिथे बसतात तिथे डस्टबिन ठेवल्या पाहिजेत. राहिलेले कामे कॉन्ट्रॅक्टदाराने ठराविक काळात पूर्ण करून घ्यावीत. अशा सूचना यावेळी पवार यांनी केल्या.
प्रशासकीय इमारतीचे 2014 ला काम सुरू झाले असले तरी थोडा उशीर झाला असेल, परंतू कामात कोणत्याही त्रुटी राहता कामा नये. आम्हाला लोकाभिमुख कारभार करायचा आहे. प्रत्येक अधिकाऱ्यांनी तसे वागले पाहिजे. प्रशासनाला एवढी चांगली इमारत करून दिल्यावर नागरिकांना हेलपाटे मारावे लागले नाही पाहिजे. असे देखील उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
या उद्घाटन कार्यक्रमावेळी उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, तालुक्याचे आमदार संजय जगताप, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, माजी आमदार अशोक टेकवडे, डॉ. दिगंबर दुर्गाडे, बाबाराजे जाधवराव, सुदाम इंगळे, विजय कोलते, जालिंदर कामठे, अभिजीत जगताप, दत्ता कड, दत्ता झुरंगे, प्रांतअधिकारी वर्षा लांडगे, तहसीलदार विक्रम राजपूत, आदी उपस्थित होते.