पुणे: प्रतिनिधी वर्षा काळे
पुण्यातील स.प. महाविद्यालयात वंदे मातरम् संघटनेच्या वतीने गेल्या वीस वर्षांपासून महाविद्यालयामध्ये अभिनव पुस्तक दहीहंडी महोत्सव साजरी केली जाते. या पुस्तक दहीहंडीच्या माध्यमातून अनाथ मुलांसाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्था किंवा अनाथालययांना या पुस्तकांचे वाटप केले जाते. एक आगळीवेगळी दहीहंडी या निमित्ताने पाहायला मिळते. यंदाच्या वर्षी देखील या दहीहंडी महोत्सवानिमित्त पुस्तक दहीहंडी साजरी करण्यात आली.
यंदाचा उद्देश हा कारगिल युद्धामध्ये शहीद झालेल्या जवानांसाठी होता. तसेच कारगिल युद्धाला पंचवीस वर्षे पूर्ण झाल्या निमित्ताने सर्व सैनिकांना मानवंदना देण्यासाठी या अभिनव पुस्तक दहीहंडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी पुण्यातील नामांकित उद्योगपती पुनीत बालन तसेच वंदे मातरम संघटनेचे सर्व पदाधिकारी अध्यक्ष उपस्थित होते. तसेच युवा वाद्यपथकाच्या ढोल ताशाच्या गजरात या दहीहंडी महोत्सवाला एक ऊर्जा मिळाल्याचे देखील पाहायला मिळाले.