जेजुरी: जेजुरी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी शासनाकडून 346 कोटी निधींची कामे करण्यात येत असून, पुरातत्व विभाग यांच्याकडून होणाऱ्या कामांची पाहणी मा. मंत्री विजय शिवतारे यांनी केली. त्यामध्ये छत्रीचे गौतमेश्वर मंदिर, कडेपठार पायरी मार्ग आदी ठिकणांची पाहणी करण्यात आली. तसेच या व्यतिरिक्त जेजुरीमध्ये पाच कोटी साठ लाख रुपयांचा निधी शासनाकडून मंजूर करवून घेतल्याबद्दल शहरातील वेताळेश्वरनगर येथील नागरिकांनी त्यांचा सत्कार केला.
तसेच शिवतारे यांच्या वतीने शहरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी विद्यामंदिर, जिजामाता हायस्कूल, दादा जाधवराव विद्यालय व इतर शाळांमध्ये 25000 वह्यांचे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर जनक बाळासाहेब जावरे यांची पीएसआय पदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा देखील सन्मान करण्यात आला.