दौंड :तालुक्यातील मळद येथील नवीन माध्यमिक विद्यालयातील एका शिक्षकाने विद्यार्थिनीशी मोबाईलवरती व्हाट्सअप वर व्हिडिओ कॉल करून अश्लील चाळे करीत असल्याचे विद्यार्थिनीने पालकांच्या लक्षात आणून दिल्याने संतप्त पालकाने शिक्षकाला बुधवारी ( ता.२१ ) चांगलाच चोप दिला. शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करून निलंबित करण्याची मागणीसाठी संतप्त ग्रामस्थांनी गुरूवारी ( ता.२२ ) विद्यालयात मोर्चा वळवला. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस घटनास्थळी दाखल होऊन ग्रामस्थांच्या भावना समजून घेतल्या. यासंदर्भात गुरुवारी दुपारपर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.
मिळालेल्या माहितीनुसार ,मळद येथील माध्यमिक विद्यालयात शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीशी व्हाट्सअपच्या व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून अत्यंत अशील चाळे करणाऱ्या शिक्षकाचे कृत्य विद्यार्थिनीने पालकांच्या निदर्शनास आणून दिले. शिक्षकाचे हे अशिल चाळे मोबाईलमध्ये पाहिल्यानंतर विद्यार्थ्यांच्या पालकांची पायाखालची वाळूच घसरली.
पीडित विद्यार्थिनींच्या संतप्त पालकांनी थेट विद्यालयात गाठून सदर शिक्षकाला चांगला चोप दिला. मात्र ही घटना गावात समजल्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी गुरुवारी संबंधित शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला निलंबित करण्याच्या मागणीसाठी विद्यालयाकडे मोर्चा वळवला.
यावेळी ग्रामस्थांनी आशिल चाळे करणारा शिक्षक, मुख्याध्यापक यांनी राजीनामा द्यावा. व संस्थेचे संचालक मंडळ बरखास्त करावे. विद्यार्थिनीची शब्द वर्तन करण्याचे यापूर्वी अनेक प्रकार घडल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली.
त्यामुळे कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थ व पालकांनी केली. संतप्त झालेल्या ग्रामस्थांकडून अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस निरीक्षक संतोष डोके व पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल होऊन शांतता ठेवण्याचा प्रयत्न केला.
यावेळी विद्यालयाकडून सदर शिक्षकाचा राजीनामा घेतल्याचे सांगण्यात आले. मात्र या उत्तराने समाधान न झालेल्या संतप्त ग्रामस्थांनी शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याच्या मागणीवर ठाम राहिले. यासंदर्भात गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन पोलीस अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना दिल्याने वातावरणातील तणाव कमी झाला. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी भेट देणार आहेत.