भोरः राजगड पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांची पदोन्नती झाली असल्याची माहिती मिळत आहे. या पदोन्नतीमध्ये पोलिसांना बढती मिळाली आहे. यामध्ये प्रामुख्याने सहाय्यक उपनिरीक्षक संजयबापू ढावरे यांची पोलीस उपनिरीक्षकपदी (PSI) पदोन्नती झाली असून, पोलीस हवालदार राजेंद्र चव्हाण व प्रतिमा भांड या दोन पोलीस कर्मचाऱ्यांची सहाय्यक उपनिरीक्षकपदी वर्णी लागली आहे. तसेच पोलीस नाईक नाना मदने, गणेश लडकत, मयूर निंबाळकर, सागर कोंढाळकर, सोमनाथ जाधव यांची हवालदार पदी पदोन्नती झाली आहे.
 
								 
                                
 
                                 
                                 
                                 
		





 
							










