शिरवळः खंडाळा तालुक्यातील भोळी गावात उसने दिलेले पैसे व हफ्ताने घेतलेल्या मोबाईलच्या कारणावरून घरात घुसून शिवीगाळ करीत मारहाण केल्याची घटना घडली आहे. तर दुसऱ्या घटनेमध्ये खिशातील पैसे हिसकावून मारहण केल्याची घटना घडल्याने या प्रकरणी दोन्ही वेगवेगळ्या घटनांमध्ये परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
१. उसने पैसे आणि मोबाईलच्या हप्त्याच्या कारणावरून मारहाण
दि. 17/08/2024 रोजी रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान भोळी, ता. खंडाळा, जि. गावच्या हद्दीतील भैरवनाथ मंदीर येथे फिर्यादी यांचा मुलगा विक्रम याने दिलेले उसने पैसे व हफ्त्याने घेतलेल्या मोबाईलच्या कारणावरून सागर बाळासो चव्हाण, अविनाश अशोक चव्हाण, आकाश अशोक चव्हाण, सर्व रा. भोळी, ता. खंडाळा, जि. सातारा, अक्षय उर्फ बंटी जगताप, रा. मांडकी, ता. पुरंदर, जि. पुणे यांनी दारू पिऊन फिर्यादी यांच्या घरात प्रवेश करून शिवीगाळ, दमदाटी करून पती व मुलगा कोठे आहेत, असा जाब विचारत त्यांच्यातील एकाने फिर्यादी यांच्या गळ्यातील 3 तोळे सोन्याची चैन हिसकावून भैरवनाथ मंदीराकडे पळत गेली. तेथे फिर्यादी यांचे पती व दोन मुले होते. त्यावेळी पती यांना झाला प्रकार सांगितले तेव्हा, त्यांनी त्यांना जाब विचारला असता पती व मुलांना देखील हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जखमी केले. या प्रकरणी सागर बाळासो चव्हाण, अविनाश अशोक चव्हाण, आकाश अशोक चव्हाण, सर्व रा.भोळी, ता. खंडाळा, जि. सातारा, अक्षय उर्फ बंटी जगताप, रा. मांडकी, ता. पुरंदर, जि. पुणे यांच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२. खिशातील पैसे हिसकावून मारहाण
दि. 17/08/2024 रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास भैरवनाथ मंदिराजवळ भोळी ता. खंडाळा जि. सातारा येथे फिर्यादी व त्यांचा चुलत भाऊ विक्रम कदम याचे सिमकार्ड देण्याकरीता गेले. तेथे हजर असलेले विक्रम कदम वय अंदाजे 28 वर्ष, त्याचा भाऊ गोरख कदम वय 23 वर्ष, वडील राजाभाऊ कदम वय 48 वर्ष सर्व रा. भोळी ता. खंडाळा जि. सातारा यानी संगणमताने फिर्यादी यांचा चुलत भाऊ सागर याला शिवीगाळ करीत खिशातील पैसे हिसकावून मारहाण केली. तसेच या घटनेत त्यास डोक्याला पान्याने दुखापत केली. असे फिर्यादीमध्ये म्हटले आहेत. या प्रकरणी विक्रम राज कदम, गोरख राजू कदम व राजू कदम सर्व रा. भोळी ता. खंडाळा यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.