Wednesday, June 3, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • क्राईम
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • क्राईम
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • क्राईम
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • संपादकीय

भीषण आग अपघातः कंन्ट्रोल सुटला अन् एसटीने दुचाकीस्वाराला चिरडले

संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद, भुईंज महामार्गावरील अपघात

by Team Rajgad Publication
August 14, 2024
भीषण आग अपघातः कंन्ट्रोल सुटला अन् एसटीने दुचाकीस्वाराला चिरडले

पुणेः पुण्याहून पलूसकडे जाणाऱ्या एसटीच्या चाकाखाली दुचाकीस्वार अडकल्याने दुचाकी काही अंतरावर घासत गेली. त्यामुळे घर्षण होऊन स्पार्किंग झाले आणि एसटीला भीषण आग लागली. या आगीत एसटीसह दुचाकीस्वार जळून खाक झाला. ही संपूर्ण घटना त्या रस्त्याच्या  बाजूला असणाऱ्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाले असून, बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास भुईंज, ता. वाई येथे घडली आहे.

अशी घडली घटना

You might also like

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

संतोष ट्रेडर्स फलटण यांच्याकडून दिवळे येथील व्यावसायिकाची तब्बल १ कोटी २६ लाखांची फसवणूक; बनावट ट्रक क्रमांकांचा वापर,

पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची नवी प्रभाग रचना आज जाहीर होणार

या घटनेतील जळून खाक झालेली एसटी पुण्याहून पलूसकडे निघाली होती. एसटीमध्ये प्रवाशी खचाखच भरले होते. महामार्गावरील भुईंज येथील विरंगुळा पेट्रोल पंपाजवळ एसटी आल्यानंतर, अचानक पुढील डाव्या बाजूच्या चाकाखाली दुचाकीस्वार अडकला. त्यानंतर काही कळायच्या आधीच डांबरावर दुचाकी घासत गेल्याने स्पार्किंग झाले. त्यामुळे दुचाकीला आग लागली. एसटीच्या चाकाखाली दुचाकीस्वार अडकला होता. त्यालाही बाहेर निघता आले नाही. एसटीलाही आग लागल्याचे समजताच चालक व वाहकाने प्रवाशांना तातडीने खाली उतरण्यास सांगितले. घाईगडबडीत प्रवाशांच्या बॅगा एसटीतच राहिल्या. प्रवाशांनी खिडकीतून, दरवाजातून उड्या मारून आपला जीव वाचवला. सर्व प्रवासी व चालक, वाहकाने खाली उतरून अग्निशमन दलाला याची माहिती दिली. पाहता पाहता आगीने राैद्ररूप धारण केले. काही क्षणातच संपूर्ण एसटी आगीच्या भक्षस्थानी पडली. वाई नगरपरिषद व भुईंज कारखाना येथून अग्निशमश दलाची गाडी घटनास्थळी आली. त्यांनी पाण्याचे फवारे मारून आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत एसटीसह दुचाकीस्वारही जळून खाक झाला. त्या मृत दुचाकीस्वाराची रात्री उशिरापर्यंत पोलिसांना ओळख पटली नव्हती. भुईंज पोलीस या अपघाताचा तपास करीत आहेत.

….तर माझी कागदपत्रे वाचली असती

पोलीस भरतीहून एक तरूणी पुण्याहून कऱ्हाडला निघाली होती. एसटीला आग लागल्यानंतर तिची बॅग एसटीमध्येच राहिली. त्या बॅगमध्ये मूळ शैक्षणिक कागदपत्रे होती. ही कागदपत्रे जळून खाक झाली. अग्नीशामक यंत्रणा लवकर आली असती तर माझी कागदपत्रे वाचली असती, अशी संतप्त भावना त्या तरूणीने बोलताना व्यक्त केली.

Tags: accidentpalusPunest bus
Team Rajgad Publication

Team Rajgad Publication

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
संतोष ट्रेडर्स फलटण यांच्याकडून दिवळे येथील व्यावसायिकाची तब्बल १ कोटी २६ लाखांची फसवणूक; बनावट ट्रक क्रमांकांचा वापर,
क्राईम

संतोष ट्रेडर्स फलटण यांच्याकडून दिवळे येथील व्यावसायिकाची तब्बल १ कोटी २६ लाखांची फसवणूक; बनावट ट्रक क्रमांकांचा वापर,

July 18, 2025
पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची नवी प्रभाग रचना आज जाहीर होणार
पुणे

पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची नवी प्रभाग रचना आज जाहीर होणार

July 14, 2025
ताज्या बातम्या

Rajgad News बातमी इफेक्ट- भोलावडेच्या पृथ्वीराज पेट्रोल पंपाजवळच्या रस्त्यावरील खड्डा बुजविला 

June 26, 2025
8 मुलींच्या विनयभंग प्रकरणातील शिक्षकास अटींवर जामीन मंजूर
क्राईम

8 मुलींच्या विनयभंग प्रकरणातील शिक्षकास अटींवर जामीन मंजूर

February 15, 2025
कौतुकास्पद : गणेश किंद्रे यांची मुंबई महानगर दंडाधिकारी न्यायालयाच्या सहाय्यकपदी निवड
ताज्या बातम्या

कौतुकास्पद : गणेश किंद्रे यांची मुंबई महानगर दंडाधिकारी न्यायालयाच्या सहाय्यकपदी निवड

January 10, 2025
Next Post
सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपूल नागरिकांसाठी खुला; उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते झाले उद्घाटन

सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपूल नागरिकांसाठी खुला; उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते झाले उद्घाटन

ताज्या बातम्या

Breking News: गर्भलिंग निदान प्रकरणात किकवीच्या डॉ. मंदार माळी यांच्यावर गुन्हा दाखल,पोलिसांकडून शोध सुरू

Breking News: गर्भलिंग निदान प्रकरणात किकवीच्या डॉ. मंदार माळी यांच्यावर गुन्हा दाखल,पोलिसांकडून शोध सुरू

May 30, 2026
न्हावी परिसरात कॉपर केबल चोरी; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

न्हावी परिसरात कॉपर केबल चोरी; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

May 26, 2026
“महामार्ग पत्रकार संघाचे कार्य कौतुकास्पद” – आमदार भीमराव तापकीर

“महामार्ग पत्रकार संघाचे कार्य कौतुकास्पद” – आमदार भीमराव तापकीर

May 26, 2026
राजगड तालुक्यात मध्यरात्री गोळीबार; दोघे जखमी, जिल्ह्यात नाकाबंदी

राजगड तालुक्यात मध्यरात्री गोळीबार; दोघे जखमी, जिल्ह्यात नाकाबंदी

May 25, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

RajgadNews.Live हे महाराष्ट्रातील एक अग्रगण्य स्थानिक मराठी न्यूज पोर्टल आहे. आमचे मुख्य उद्दिष्ट जगभरातील आमच्या वाचकांसाठी ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आणि महत्त्वपूर्ण माहिती अचूकपणे आणि थेट मराठीत पोहोचवणे हे आहे. राजकीय, सामाजिक, क्रीडा असो वा स्थानिक घडामोडी, महाराष्ट्रातील प्रत्येक कानाकोपऱ्यातील बातमी आम्ही तुमच्यापर्यंत प्रामाणिकपणे पोहोचवतो.

Follow Us

Copyright © 2026. Rajgad News.live

No Result
View All Result
  • Home
  • क्राईम
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Copyright © 2026. Rajgad News.live

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us