भोरला विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मिडीयम स्कूल, उन्नती महिला प्रतिष्ठान ,जिजामाता हायस्कूल, गर्ल हायस्कूल,दिवाणी न्यायालय, शहरासह ग्रामीण भागात योग दिन साजरा
भोर- २१ हा दिवस सर्व जगभरात जागतिक योग दिवस म्हणून साजरा जूनकेला जातो. याचेच औचित्य साधून भोर तालुक्यात सर्वत्र योग दिवस उत्साहात आणि आनंदात साजरा केला गेला. निरोगी शरीर तसेच आनंदी समाधानी मन यासाठी योग हा खूप महत्त्वाचा आहे. दररोज योग केल्याने आपले शरीर निरोगी राहते, सुदृढ बनते, रोग प्रतिकारशक्ती वाढते, शरीराला ऊर्जा व मनाला शांती मिळते तसेच आपल्या दैनंदिन जीवनात ताण- तणाव दूर करू होऊन मानव मोठ मोठ्या आजारावर मात करू शकतो आणि याचमुळे आज विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये मोठया उत्साहात योग दिवस साजरा करण्यात आला. यावेळी विद्यालयाच्या नर्सरी ते दहावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना योग दिनाचे मार्गदर्शन करून योग दिन साजरा केला. विद्यार्थ्यांनीही मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. या वेळी योगाचे महत्व व योग दिन का साजरा करतात या विषयी माहिती सांगितली गेली .यावेळी क्रिडा शिक्षक संतोष मादगुडे व माधुरी देशमाने यांनी विद्यार्थ्यांना सूर्यनमस्कार व योगासनांचे
प्रात्यक्षिक करून दाखवले व त्याच प्रमाणे सर्व विद्यार्थ्यांनी योगासने केली . सर्व विद्यार्थ्यांना योगाचे जीवनातील महत्व समजले व सर्व विद्यार्थ्यांनी रोज योग करण्याची प्रार्थना केली. या योग दिना दिवशी सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचारी यांनी ही सहभाग नोंदवला.या कार्यक्रमाचे आयोजन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अश्विनी मादगुडे , क्रिडा शिक्षक संतोष मादगुडे यांनी केले . तसेच संगीत शिक्षक प्रा. खोपडे व कला शिक्षक प्रा. महांगरे तसेच विभाग प्रमुख रेणुका बांदल व सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले.अशा प्रकारे योग दिवस साजरा करण्यात आला.
दरवर्षी प्रमाणे या वर्षी वटपौर्णिमा निमित्ताने उन्नती महिला प्रतिष्ठानने गर्ल्स हायस्कूल भोर येथे वृक्ष लागवड करून धार्मिक पध्दतीने विधीवत वटपौर्णिमा साजरी केली. आज जागतिक योग दिना निमित्ताने पतंजली आणि उन्नती महिला प्रतिष्ठानने शाळेतील मुलांचा योगा घेऊन योग दिन साजरा केला. यावेळी उन्नती प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सीमा तनपुरे , उपाध्यक्षा द्रौपदी भेलके, रेखा टापरे , बोरकरमॅडम, पाटीलमॅडम , सुमिता सुर्वे, भाग्यश्री वरटे , अर्चना रोमण आदि महिला व विद्यार्थीनीं उपस्थित होत्या.
पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, पुणे, भोर तालुका विधी सेवा समिती भोर यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाणी न्यायालय क. स्तर, भोर येथे आज आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा झाला. या कार्यक्रमामध्ये भोर दिवाणी न्यायालयाच्या प्रमुख न्यायाधीश श्रीमती नेहा नागरगोजे यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर, योग प्रशिक्षक अनंता शिर्के व यशवंत भेलके यांनी उपस्थीत न्यायाधीशांसह , उपस्थित विधीज्ञ, न्यायालयीन कर्मचारी व पोलिस कर्मचारी यांचेकडून योग अभ्यासाची प्रात्यक्षिके करून घेतली. नंतर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन भोर वकील संघाचे सदस्य ॲड. संतोष बाठे यांनी केले. सदर कार्यक्रमास भोर वकील संघाचे सचिव ॲड. राकेश कोंडे, सदस्य ॲड. अजिंक्य मुकादम, ॲड. जगन्नाथ चिव्हे, न्यायालयाचे सहाय्यक अधीक्षक नामदेव बोत्रे व न्यायालयीन कर्मचारी कैलास आखाडेंसह इतरही कर्मचारी, शिपाई उपस्थीत होते.
तालुक्यातील शहरासह ग्रामीण भागातील सर्व छोट्या मोठ्या विद्यालये,शाळा यांमधुन योगाचे महत्त्व जाणून योगदान साजरा झाला.