भोर : जी मंडळी आजच्या चालूघडीला एमआयडीसी व्हावी या मुद्द्याबाबत भूमिका घेत आहेत अशी सर्व मंडळी १९९२ पासुन एमआयडीसी मुद्दा हाताळत आहेत.गेली पंधरा वर्षात हीच मंडळी केंद्र, राज्य , जिल्हा परिषद , पंचायत समिती सत्ता स्थानी असताना यांनी पंधरा वर्ष काय केले आणि आता लोकसभेची निवडणूक आली की,या एमआयडीसीच्या मुद्द्यावर सूतोवाच भाष्य करून भोर तालुक्यातील, शहरातील तरूणांना भडकवत एमआयडीसीचा मुद्दा जाणीव पूर्वक पेटवण्याचे काम विरोधक करत आहे असे प्रतिपादन लोकसभेच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ भोर शहरातील शुक्रवार (दि.३) रात्री सुभाष चौक येथे कोपरा सभेची सांगता करताना आमदार संग्राम थोपटे यांनी केले .
थोपटे पुढे म्हणाले की भोर बाजारपेठेला उर्जित अवस्था येण्यासाठी, बाजारपेठेत उद्योगधंदे वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले .प्रकल्पांबाबत, उद्योगधंद्यांबाबत, महागाई बाबत धोरणे ही केंद्रामध्ये ठरत असतात सदरच्या केंद्रसरकारने राज्यात आलेले मोठमोठे प्रकल्प बाहेरच्या राज्यात गुजरातला नेले भोर सारख्या ठिकाणी एमआयडीसी दर्जा आहे हे माहीत असताना देखील बाहेर गेलेले प्रकल्प तरी येथे का आणू शकले नाही, त्यासाठी प्रयत्न का केले नाही असे देखील विरोधकांचा समाचार घेत सभेची सांगता करताना सांगितले नुसते तरुणांना भडकावुन एमआयडीसी होणार नाही त्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत असे ते म्हणाले.
यावेळी भोरचे माजी नगरसेवक विठ्ठल शिंदे, तालुकाध्यक्ष शैलेश सोनवणे, सचिन हर्णसकर, वैशाली कांबळे ,अमित सागळे, जगदीश किरवे, तृप्ती किरवे,तौसिफ आतार, बंडुशेठ गुजराथी,रतन ढवळे, अमर सुपेकर, हेमंत किरवे असे असंख्य कार्यकर्ते,पदाधिकारी उपस्थित होते.