गावात स्वच्छतेसह ,विद्युत रोषणाई, माहेरवाशीण – सासुरवाशीण महिला मुलींचा सहभाग लक्षणीय
भोर तालुक्यातील वेळवंड खो-याचे प्रवेशद्वार असलेल्या बसरापुर या ठिकाणी बुधवार व गुरूवार (दि.२८-२९) या गावचे ग्रामदैवत असणाऱ्या लक्ष्मी माता मंदिर व मरीआई माता मंदिर जिर्णोद्धार ग्रामप्रदक्षिणा मिरवणूक सोहळा उत्साहात संपन्न झाला. हे गाव तालुक्यात नेहमीच आगळ्यावेगळ्या उपक्रमासाठी प्रसिद्ध आहे.वेळवंडी नदीवर देवांना धार्मिक पारंपारिक पद्धतीने स्नान घालून नदी पासुन देवांची मिरवणूक काढली.यावेळी वेळवंडी नदीवर जनसागर लोटला होता.
भोर शहरापासून दोन किमी अंतरावर असलेल्या बसरापुर या ठिकाणी गावच्या लोकवर्गणीतून व ऐच्छिक वर्गणीतून गावातील दोन मंदिरे बांधण्यात आली. यातील दोन मंदिरामध्ये ग्रामदैवत मरीआई माता व लक्ष्मीआई माता अशा गावदेवांचा समावेश आहे. या गावचे स्वातंत्र्योत्तर काळात दोन वेळा पुनर्वसन झाले आहे. ज्या वेळी १९२४ साली छोटे भाटघर धरण झाले त्यावेळी या धरण क्षेत्रातील गावे वरच्या भागात गावे वसली त्यात बसरापुरचा समावेश होता. अशा १०० वर्षे पूर्ण झालेल्या गावच्या मंदिराच्या जिर्णोद्धार मिरवणूकीचा सोहळा महिला पुरुषांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. मिरवणूक, महाप्रसाद, किर्तन असा कार्यक्रम सोहळा आयोजित केला होता.या मिरवणूकीत माहेरवाशीण सासुरवाशीण महिला मुली युवतींचा लक्षणीय सहभाग होता.
यावेळी या गावच्या कार्यक्रमासाठी या भागातील वेळवंड खोऱ्याचे लोकनेते माजी पंचायत समिती उपसभापती मानसिंगबाबा धुमाळ, भोर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष रवींद्र बांदल,म्हाळवडी गावचे विद्यमान सरपंच दत्तात्रय बोडके,लहु बोडके,उमेश बोडके, दिगंबर बोडके,नथुबुवा बोडके असे म्हाळवडी गावचे ग्रामस्थ उपस्थित होते.या कार्यक्रमाचे नियोजन या गावचे माजी सरपंच रमेश झांजले,मोहन बदक , विष्णु पवार, रामचंद्र झांजले, रमेश झांजले, सुर्यकांत बदक, तंटामुक्ती अध्यक्ष रामचंद्र झांजले,सरपंच संतोष झांजले, उपसरपंच रामदास झांजले, अर्जून झांजले, रामचंद्र झांजले, पोलीस पाटील विठ्ठल झांजले, जयवंत झांजले, शिवाजी झांजले, मारुती झांजले ,अजित बदक, आकाश बदक,ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर साळुंके , दिलीप खाटपे , पंकज झांजले,केशव साळुंके आदि ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात केले.