कायदेविषयक जनजागृती व मराठी भाषेचे महत्त्व व मार्गदर्शन
पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पुणे, तालुका विधी सेवा समिती भोर व भोर वकील संघटना यांचे संयुक्त विद्यमाने भोर दिवाणी न्यायालय भोर येथे उपस्थित वकील सदस्य, न्यायालयीन कर्मचारी यांना कायदेविषयक जनजागृती मार्गदर्शन करत मराठी भाषा संवर्धन दिन मंगळवार (दि.२७) साजरा करण्यात आला.
सदर कायदेविषयक व्याख्यानमालेत भोर दिवाणी न्यायालयाच्या प्रमुख न्यायाधीश नेहा नागरगोजे व सह दिवाणी न्यायाधीश दिप्ती सरनायक यांनी मराठी भाषा संवर्धन दिनानिमित्त न्यायालयीन कामकाज मध्ये मराठी भाषेचे महत्व सांगितले. सदर कार्यक्रमात प्रमुख वक्ते राजा रघुनाथ विद्यालय व जूनियर कॉलेज भोरच्या प्राध्यापिका श्रीमती स्वाती दूधगावकर यांनी विस्तृत स्वरूपात मराठी भाषेचे महत्त्व सांगितले व मराठी कशी जतन करायची याविषयी मार्गदर्शन केले. तसेच भोर वकील संघटनेच्या वकील सदस्या विधीज्ञ श्रीमती मनिषा तारू यांनी मराठी भाषेचे महत्व याबद्दल थोडक्यात माहिती सांगितली. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भोर वकील संघटनेचे सचिव विधीज्ञ राकेश कोंडे यांनी केले ,तर आभार भोर वकील संघटनेचे सदस्य विधीज्ञ विजय दामगुडे यांनी केले.
सदर कार्यक्रमास भोर वकील संघटनेचे अध्यक्ष विधीज्ञ मयूर धुमाळ, विधीज्ञ माणिकराव जायगुडे, कृष्णराव बांदल, राजेंद्र खोपडे, अजिंक्य मुकादम, पृथ्वीराज चव्हाण, शिवाजी पांगारे, दत्तात्रय उरुणकर, जगन्नाथ चिव्हे, विश्वनाथ रोमन, राजश्री बोरगे, जयश्री शिंदे व इतर वकील सदस्य व न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते.