बाळु शिंदे: राजगड न्युज
कापूरहोळ : पुणे-सातारा महामार्गालगत असलेल्या सारोळा गावच्या हद्दीतील नीरा नदी पात्रात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह मिळाला असून ओळखीचे असल्यास राजगड पोलीसांशी संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.
राजगड पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार,पुणे सातारा महामार्गावर सुसाईट पॉइंट म्हणून ओळख असलेल्या नीरा नदी पात्रात दि.१२ रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह तरंगताना आढळून आला. याबाबत स्थानिकांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता राजगड पोलिसांना याबात माहिती दिली राजगड पोलीस तात्काळ घटनास्थळी धाव घेत सारोळा ता.भोर येथील वैकुंठ स्मशानभूमी लगत असणाऱ्या नीरा नदी पात्रा मध्ये एका व्यक्तीचा मृतदेह तरंगत असल्याचे दिसून आले स्थानिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आल .पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी भोर येथील उपविभागीय रुग्णालयात पाठविले असता पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
सदर मृतदेह सडपातळ बांधा, रंग गहुवर्निय गोरा, वय ५५-६०,अंगावर पांढऱ्या रंगाचा पायजमा व हिरव्या पिवळ्या रंगाचा लाईनीचा शर्ट असे वर्णन आहे.अशा वर्णनाची कोणी व्यक्ती काही दिवसांपासून गायब असल्यास राजगड पोलीस स्टेशन शी संपर्क साधावा असे आवाहन राजगड पोलिसांकडून करण्यात आले असून. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक नाना मदने करीत आहेत.