भोर प्रतिनिधी -कुंदन झांजले
भोर बसस्थानक सुसज्ज करणार
भोर आगारामधून चिखलगाव-वाशी-कोपरखैरणे एस.टी.बस सेवेचा शुभारंभ सोमवार( दि.९ ) भोर, वेल्हा, मुळशीचे आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते करण्यात आला. भोर बस स्थानकातील दुरावस्था, नागरिकांच्या वारंवार येणाऱ्या एसटीबाबतच्या तक्रारी , तसेच शालेय विद्यार्थ्यांच्या समस्या अडचणी, एसटी बसस्थानकात नागरिकांची होणारी गैरसोय हे सर्व पाहता लवकरच एसटीबाबत निधी उपलब्ध करून बसस्थानक सुसज्ज बनवणार असल्याचे प्रतिपादन यावेळी आमदार संग्राम थोपटे यांनी केले.तालुक्याच्या पश्चिमेकडील नाझरे,आंबवडे, कर्नावड, रावडी, चिखलगाव, धोंडेवाडी,टिटेघर, वडतुंबी, कोर्ले, म्हाकोशी या भागातील बहुतांशी नागरिक वास्तव्यास नवी मुंबई(वाशी) कोपरखैरणे,पनवेल व मुबंईच्या अन्य भागात वास्तव्यास आहेत. नागरिकांना सणासुदीला, लग्न समारंभ व इतरही सुख दुःखाच्या कार्यक्रमांना वारंवार ये-जा करावे लागते . परंतु या मार्गांवरील एस.टी.बसची सेवा बंद असल्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांची गैरसोय होत होती. आमदार संग्राम थोपटे यांनी नागरिकांची गैरसोय लक्षात घेता आगार व्यवस्थापकांना तात्काळ सूचना देऊन, या मार्गांवरील एस.टी.बस सेवा पूर्ववत केली. यावेळी माजी उपनगराध्यक्ष समीर सागळे, नगरसेवक गणेश पवार, आगार व्यवस्थापक प्रवीण बांद्रे, खरेदी विक्री संघाचे संचालक दिलीप वरे,राजगड साखर कारखान्याचे संचालक सुभाष कोंढाळकर, आनंदराव धोंडे, पांडुरंग धोंडे, सुखदेव कुंभार ,कांता शिवतरे , मारूती धोंडे, संघटना जिल्हाध्यक्ष मोहन जेधे, बंडू खोपडे, भाऊ जाधव आदींसह या भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तालुक्याच्या पश्चिमेकडील नाझरे,आंबवडे, कर्नावड, रावडी, चिखलगाव, धोंडेवाडी,टिटेघर, वडतुंबी, कोर्ले, म्हाकोशी या भागातील बहुतांशी नागरिक वास्तव्यास नवी मुंबई(वाशी) कोपरखैरणे,पनवेल व मुबंईच्या अन्य भागात वास्तव्यास आहेत. नागरिकांना सणासुदीला, लग्न समारंभ व इतरही सुख दुःखाच्या कार्यक्रमांना वारंवार ये-जा करावे लागते . परंतु या मार्गांवरील एस.टी.बसची सेवा बंद असल्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांची गैरसोय होत होती. आमदार संग्राम थोपटे यांनी नागरिकांची गैरसोय लक्षात घेता आगार व्यवस्थापकांना तात्काळ सूचना देऊन, या मार्गांवरील एस.टी.बस सेवा पूर्ववत केली. यावेळी माजी उपनगराध्यक्ष समीर सागळे, नगरसेवक गणेश पवार, आगार व्यवस्थापक प्रवीण बांद्रे, खरेदी विक्री संघाचे संचालक दिलीप वरे,राजगड साखर कारखान्याचे संचालक सुभाष कोंढाळकर, आनंदराव धोंडे, पांडुरंग धोंडे, सुखदेव कुंभार ,कांता शिवतरे , मारूती धोंडे, संघटना जिल्हाध्यक्ष मोहन जेधे, बंडू खोपडे, भाऊ जाधव आदींसह या भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.