राजगड न्युज नेटवर्क
विघ्नहर्ता पतसंस्थेचा सहा टक्के लाभांष जाहीर
भोर : पतसंस्थेमुळे खाजगी सावकारीला आळा बसला असुन छोटे व्यवसायीक व सर्वसामान्यांना पतसंस्था मोठा आधार वाटतात असे मत विघ्नहर्ता पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत बाठे यांनी पतसंस्थेच्या पंचविसाव्या वार्षिक सभेप्रसंगी व्यक्त केले.
भोर तालुक्याच्या पुर्व भागातील विघ्नहर्ता पतसंस्था मागील पंचविस वर्षे सभासदांचे विघ्न हरण्याचे काम प्रामाणिकपणे करीत आहे. संस्थेने कोरोना कालावधी व्यतिरिक्त सातत्याने सभासदांना लाभांष वाटप केलेले असुन संस्थेला यावर्षी लेखापरिक्षणामध्ये अ वर्ग मिळाल्याचे उपाध्यक्ष प्रकाश तनपुरे यांनी सांगितले.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष प्रकाश तनपुरे, सचिव काळुराम महांगरे, संचालक अंकुश चव्हाण, ज्ञानेश्वर चव्हाण, गणपत भंडलकर, उदयोजक सुनिल धाडवे, शेखर शेटे, भरत बोबडे आदि मान्यवरांसह सभासद मोठया संस्थेने उपस्थित होते.
संस्थेच्या ठेवी १८.२७ कोटी असुन कर्ज वाटप १३.२७ कोटी इतके आहे. संस्थेने ५.४४ कोटींची गुंतवणुक केलेली आहे. संस्थेचे वसुल भाग भांडवल हे १. ३९ कोटी इतके आहे. संस्थेचे खेळते भांडवल २२. ७९ कोटी इतके आहे. संस्थेला ऑडिट वर्ग अ मिळालेला असुन यावर्षी सहा टक्के लाभांष जाहिर केलेला असुन तो सभासदांच्या बचतखात्यावर वर्ग करण्यात येईल अशी माहिती संस्थेचे सचिव काळुराम महांगरे यांनी दिली.
सर्वसामान्य व्यक्तींना तसेच व्यवसायिकांना बॅन्कांमधुन कर्ज घेताना अनेक कागपत्रांची पुर्तता करावी लागते. त्यासाठी अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. विघ्नहर्ता पतसंस्था ही तातडीने कर्ज पुरवठा करते. कर्जाच्या ओझ्याखाली कर्जदार दबला जाऊ नये म्हणुन संस्था सरळव्याजाने कर्जपुरवठा करते. संस्थेचा उद्देश केवळ नफा कमविणे हा नसुन संस्थेमार्फत अनेक सामाजिक उपक्रम राबविले जात असल्याचे बाठे यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे सुञसंचालन सचिव काळुराम महांगरे यांनी केले तर आभार प्रकाश तनपुरे यांनी मानले.