Tuesday, August 18, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

जल जीवन मिशनचा करंदी खेबाला दिलासा; कायमस्वरूपी पाणीपुरवठ्यामुळे टँकरला अखेर पूर्णविराम

by SBPRNL
July 2, 2026
जल जीवन मिशनचा करंदी खेबाला दिलासा; कायमस्वरूपी पाणीपुरवठ्यामुळे टँकरला अखेर पूर्णविराम

भोर, प्रतिनिधी : भोर तालुक्यातील करंदी खेबा गावातील नागरिकांना अनेक वर्षांपासून भेडसावणाऱ्या पाणीटंचाईच्या समस्येवर अखेर कायमस्वरूपी तोडगा निघाला आहे. जल जीवन मिशन अंतर्गत राबविण्यात आलेल्या ग्रामीण नळ पाणीपुरवठा योजनेमुळे गावाला शाश्वत जलस्रोत उपलब्ध झाला असून टँकरद्वारे होणारा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. यामुळे विशेषतः महिलांची पाण्यासाठीची रोजची धावपळ थांबणार असून ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

पुणे–सातारा महामार्गापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या करंदी खेबा गावासाठी सुमारे दोन कोटी रुपयांची ग्रामीण नळ पाणीपुरवठा योजना मंजूर झाली होती. मात्र, योजनेतील सुमारे ३०० मीटर पाईपलाईन वन विभागाच्या हद्दीतून जाणार असल्याने आवश्यक परवानग्या मिळण्यात विलंब झाला. त्यामुळे ही योजना जवळपास दोन वर्षे रखडली आणि गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली. परिणामी प्रशासनाला टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत होता.

You might also like

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

त्यानंतर वन विभाग, जलसंपदा विभाग आणि ग्रामीण पाणीपुरवठा विभाग यांच्या समन्वयातून आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. देवडी येथील पाझर तलावातील पाझर विहिरीमधून सुमारे १,३०० मीटर लांबीच्या दाब नलिकेद्वारे करंदी खेबा गावातील विहिरीपर्यंत पाणी पोहोचविण्यात आले. चाचणी यशस्वी झाल्यानंतर नियमित पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असून गावाला वर्षभरासाठी शाश्वत पाणी उपलब्ध झाले आहे.

या योजनेमुळे शासनाचा टँकरवरील खर्च वाचणार असून नागरिकांना सुरक्षित व शुद्ध पिण्याचे पाणी नियमित मिळणार आहे. विशेषतः महिलांना पाण्यासाठी करावी लागणारी पायपीट, वेळेचा अपव्यय आणि अतिरिक्त श्रम यापासून मोठा दिलासा मिळाला आहे.

या योजनेच्या अंमलबजावणीसाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत, ग्रामस्थ, जिल्हा प्रशासन, वन विभाग, जलसंपदा विभाग आणि ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग यांनी संयुक्तपणे प्रयत्न केले. सरपंच नवनाथ गायकवाड, उपसरपंच कोमल गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे तांत्रिक व प्रशासकीय अडचणी दूर होऊन योजना पूर्णत्वास गेली.

जल जीवन मिशनच्या माध्यमातून ग्रामीण भागातील प्रत्येक घरापर्यंत सुरक्षित पिण्याचे पाणी पोहोचविण्याच्या शासनाच्या उद्दिष्टाला करंदी खेबा येथे यश मिळाले असून हा प्रकल्प परिसरातील इतर गावांसाठीही मार्गदर्शक ठरत आहे.

SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव
ताज्या बातम्या

August 16, 2026
आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त
ताज्या बातम्या

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

August 14, 2026
‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!
क्राईम

August 8, 2026
‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

ब्रेकींग: खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडीत रक्तरंजित मध्यरात्री! रॉड-विटांनी जीवघेणा हल्ला, तीन राऊंड गोळीबार; एक गंभीर जखमी, हल्लेखोर फरार

July 28, 2026
पोलखोल | दरोडेखोरांवर कारवाई की जप्त रकमेवरच डल्ला ? नऱ्हे दरोडा प्रकरणात राजगड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी चर्चेत
भोर

July 20, 2026
Next Post
भोरच्या राष्ट्रवादीच्या सभापतींवर निधी वाटपात पक्षपातीपणाचा आरोप; सदस्यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा

भोरच्या राष्ट्रवादीच्या सभापतींवर निधी वाटपात पक्षपातीपणाचा आरोप; सदस्यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा

ताज्या बातम्या

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

August 16, 2026
आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

August 14, 2026
‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

August 8, 2026
‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

August 8, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group