Tuesday, August 18, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

शिंदेवाडी बोगद्यानजीक ११ बाईकस्वारांकडून व्यावसायिकाला बेदम मारहाण; वाहनाची तोडफोड

by SBPRNL
July 1, 2026
शिंदेवाडी बोगद्यानजीक ११ बाईकस्वारांकडून व्यावसायिकाला बेदम मारहाण; वाहनाची तोडफोड

नसरापूर, प्रतिनिधी : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील शिंदेवाडी येथील नवीन बोगद्याजवळ एका व्यावसायिकाला अडवून तब्बल ११ बाईकस्वारांनी बेदम मारहाण करत वाहनाची तोडफोड केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात दहा दुचाकी क्रमांकधारकांसह दोन अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सोहेल रज्जाक मुलाणी (वय ३०) हे २१ जून रोजी सकाळी सुमारे ७.१५ वाजता खेडशिवापूर दर्ग्याकडे जात होते. त्यावेळी शिंदेवाडी गावाच्या हद्दीतील नवीन बोगद्याजवळ विविध स्पोर्ट्स बाईकवरून आलेल्या युवकांनी त्यांची गाडी अडवली. त्यापैकी एका युवकाने, “तुझी गाडी माझ्या गाडीला घासली आहे,” असा आरोप करत वाद घालण्यास सुरुवात केली.

You might also like

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

काही क्षणांतच हा वाद हाणामारीत बदलला. उपस्थित बाईकस्वारांपैकी पाच ते सहा जणांनी सोहेल मुलाणी यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच हातात घातलेल्या स्टीलच्या ग्लोव्हजनेही त्यांच्यावर हल्ला करण्यात आल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. या हल्ल्यात ते जखमी झाले.

मारहाणीनंतर आरोपींनी फिर्यादीच्या वाहनाची तोडफोड करत दोन्ही बाजूंचे आरसे फोडले तसेच वाहनाच्या विविध भागांचे नुकसान केले. या प्रकारात सुमारे सात लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा फिर्यादीने तक्रारीत केला आहे.

घटनेनंतर फिर्यादीने राजगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी संबंधित दुचाकी क्रमांकांच्या आधारे संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, महामार्गावरील देखरेख कॅमेरे तसेच वाहनांच्या नोंदणीची माहिती तपासून आरोपींची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली राजगड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मछले करीत आहेत.

SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव
ताज्या बातम्या

August 16, 2026
आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त
ताज्या बातम्या

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

August 14, 2026
‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!
क्राईम

August 8, 2026
‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

ब्रेकींग: खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडीत रक्तरंजित मध्यरात्री! रॉड-विटांनी जीवघेणा हल्ला, तीन राऊंड गोळीबार; एक गंभीर जखमी, हल्लेखोर फरार

July 28, 2026
पोलखोल | दरोडेखोरांवर कारवाई की जप्त रकमेवरच डल्ला ? नऱ्हे दरोडा प्रकरणात राजगड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी चर्चेत
भोर

July 20, 2026
Next Post
जल जीवन मिशनचा करंदी खेबाला दिलासा; कायमस्वरूपी पाणीपुरवठ्यामुळे टँकरला अखेर पूर्णविराम

जल जीवन मिशनचा करंदी खेबाला दिलासा; कायमस्वरूपी पाणीपुरवठ्यामुळे टँकरला अखेर पूर्णविराम

ताज्या बातम्या

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

August 16, 2026
आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

August 14, 2026
‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

August 8, 2026
‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

August 8, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group