Friday, June 12, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

शिंदेवाडीत जुगार अड्ड्यावर राजगड पोलिसांचा छापा; ३० लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

by SBPRNL
June 12, 2026
शिंदेवाडीत जुगार अड्ड्यावर राजगड पोलिसांचा छापा; ३० लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

भोर, प्रतिनिधी : भोर तालुक्यातील शिंदेवाडी येथे जुन्या पुणे-सातारा महामार्गालगत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर राजगड पोलिसांनी धाड टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत सहा जणांना ताब्यात घेण्यात आले असून तब्बल ३० लाख ६५ हजार ६२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याप्रकरणी राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल पप्पु रामा शिंदे यांनी फिर्याद दिली असून त्यावरून संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

You might also like

विजेचा शॉक लागून ५५ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; गाईचाही जागीच मृत्यू

भोर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी निलेश पांडुरंग माने यांची नियुक्ती

राजगड पोलीस ठाण्याला नवे पोलिस निरीक्षक; संतोष जाधव यांची नियुक्ती, राजेश गवळी यांची पुणे ग्रामीणमध्ये बदली

पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार शिंदेवाडी गावाच्या हद्दीत हॉटेल आमराईजवळील पत्र्याच्या शेडमध्ये ‘सोरट’ नावाचा जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी छापा टाकला. कारवाईदरम्यान काही जण घटनास्थळावरून पसार झाले, तर सहा जणांना ताब्यात घेण्यात आले.

या प्रकरणात सचिन अंकुश बागल, मनोज दिनकर काळाणे, सशांक मच्छीद्र मेमाणे, गणेश पाडुरंग वाळुंज, धनाजी राजाभाऊ जाधव आणि निखील रामचंद्र तुगंतकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

छाप्यात जुगारासाठी वापरण्यात येणारे डिजिटल सोरट मशीन, टेबल, खुर्च्या, जुगाराचे चार्ट, वह्या, कच्च्या स्लिपा, टोकन, विविध कंपन्यांचे मोबाईल फोन, रोख रक्कम तसेच दुचाकी आणि चारचाकी वाहने असा मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त वाहनांमध्ये अनेक दुचाकींसह महिंद्रा एक्सयूव्ही ७०० या चारचाकी वाहनाचाही समावेश आहे.

पोलिसांनी जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये २ लाख ११ हजार ६२० रुपयांची रोख रक्कम, विविध कंपन्यांचे मोबाईल फोन तसेच जुगाराच्या व्यवहारासाठी वापरण्यात येणारे साहित्य आढळून आले. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून जुगार व्यवसायाविरोधात पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राठोड करीत असून फरार झालेल्या संशयितांचा शोध सुरू आहे.

SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

विजेचा शॉक लागून ५५ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; गाईचाही जागीच मृत्यू
वेल्हे

विजेचा शॉक लागून ५५ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; गाईचाही जागीच मृत्यू

June 9, 2026
भोर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी निलेश पांडुरंग माने यांची नियुक्ती
भोर

भोर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी निलेश पांडुरंग माने यांची नियुक्ती

June 8, 2026
राजगड पोलीस ठाण्याला नवे पोलिस निरीक्षक; संतोष जाधव यांची नियुक्ती, राजेश गवळी यांची पुणे ग्रामीणमध्ये बदली
ताज्या बातम्या

राजगड पोलीस ठाण्याला नवे पोलिस निरीक्षक; संतोष जाधव यांची नियुक्ती, राजेश गवळी यांची पुणे ग्रामीणमध्ये बदली

June 8, 2026
केडगाव गर्भलिंग निदान प्रकरण : दोन डॉक्टरांवर नवा गुन्हा, मात्र डॉ. मंदार माळी अद्याप फरारच
दौंड

केडगाव गर्भलिंग निदान प्रकरण : दोन डॉक्टरांवर नवा गुन्हा, मात्र डॉ. मंदार माळी अद्याप फरारच

June 7, 2026
भोर तालुक्यातील गुटखा माफियांवर कारवाई केव्हा? की संगनमत?
क्राईम

भोर तालुक्यातील गुटखा माफियांवर कारवाई केव्हा? की संगनमत?

June 6, 2026
भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026

ताज्या बातम्या

शिंदेवाडीत जुगार अड्ड्यावर राजगड पोलिसांचा छापा; ३० लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

शिंदेवाडीत जुगार अड्ड्यावर राजगड पोलिसांचा छापा; ३० लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

June 12, 2026
विजेचा शॉक लागून ५५ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; गाईचाही जागीच मृत्यू

विजेचा शॉक लागून ५५ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; गाईचाही जागीच मृत्यू

June 9, 2026
भोर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी निलेश पांडुरंग माने यांची नियुक्ती

भोर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी निलेश पांडुरंग माने यांची नियुक्ती

June 8, 2026
राजगड पोलीस ठाण्याला नवे पोलिस निरीक्षक; संतोष जाधव यांची नियुक्ती, राजेश गवळी यांची पुणे ग्रामीणमध्ये बदली

राजगड पोलीस ठाण्याला नवे पोलिस निरीक्षक; संतोष जाधव यांची नियुक्ती, राजेश गवळी यांची पुणे ग्रामीणमध्ये बदली

June 8, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group