भोर प्रतिनिधी – कुंदन झांजले
भोर: स्वच्छ भारत मिशन अंतर्गत देशात सर्वत्र १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोंबर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली आहे. त्यामध्ये १ ऑक्टोंबर रोजी किमान १तास स्वच्छतेसाठी सर्वांनी देण्याचा उपक्रम सर्वत्र तालुक्यातील शहरासह , सर्व ग्रामीण भागातून राबविण्यात आला.यावेळी शहरासह ग्रामीण भागातून सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता करून साफसफाई करण्यात आली.यामध्ये लोकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेत श्रमदान केले.
सार्वजनिक ठिकाणी यामध्ये गावातील मंदिरे,शाळा, रस्ते,गटारे, स्मशानभूमी यांची स्वच्छता करण्यात आली.भोर शहरात नगरपालिका, पोलीस स्टेशन, तहसीलदार कार्यालय,राजवाडा,शनीघाट नदी परिसर,रस्ते, दवाखाने यांची स्वच्छता करण्यात आली.
ग्रामीण भागात भाबवडीत आदर्श सरपंच अमर बुदगुडे यांच्या उपस्थितीत रस्ता,शाळा, मंदिर परिसर स्वच्छ केला,तर बसरापुर या ठिकाणी महिला सरपंच निलम संतोष झांजले यांच्या उपस्थितीत नदी घाट परिसर , स्मशानभूमी,मंदिर,शाळा परिसर स्वच्छ करून,कचरा व्यवस्थापन योग्य प्रकारे करण्यात आले.यावेळी गावातील महिला,पुरुष, तरूण-तरूणी,ग्रामसेवक व गावातील पदाधिकारी उपस्थित होते.या स्वच्छता मोहिमेद्वारे प्रदूषणाला आळा बसणार असून रोगराई कमी होण्यास मदत होणार आहे.
हि स्वच्छता मोहिम यशस्वी होऊन स्वच्छ, सुजलाम, सुफलाम ,कचरामुक्त भारत होवो हीच देशवासीयांची २ ऑक्टोंबर गांधी जयंती निमित्त गांधीजींना भावपूर्ण आदरांजली असणार आहे असे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.