भोर – राजा रघुनाथराव विद्यालय भोर मध्ये उल्लास नवभारत साक्षरता उपक्रमांतर्गत भोर एज्युकेशन सोसायटीच्या राजा रघुनाथराव विद्यालयात पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मुल्यमापन चाचणीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी या अभियानात २२ नवसाक्षर महिला पुरुष परिक्षार्थींनी सहभाग नोंदवला. त्यांना शिकवणारे स्वयंसेवक व विद्यालयातील शिक्षक उपस्थीत होते. परीक्षा सुरु होण्यापूर्वी नवसाक्षरांचे विद्यालयाच्या वतीने गुलाबपुष्प देवून स्वागत करण्यात आले. पंचायतसमिती भोरचे गटशिक्षण अधिकारी राजकुमार बामणे, केंद्रप्रमुख रामदास पाटील, विषयतज्ञ सुनील गोरड त्याचबरोबर प्रा. गव्हाणे उपस्थीत होते. सर्वांना शुभेच्छा दिल्या नंतर दिलेला पेपर परीक्षार्थींनी अतिशय आनंदात पेपर सोडवला. शिकलेल्याचा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. स्वयंसेवक पण राष्ट्रकार्यात हातभार लागल्यामुळे समाधानी दिसत होते. विद्यालयाच्या वतीने सोमनाथ कुंभार यांनी केंद्राध्यक्ष म्हणून काम पाहिले. वंदना किरवे यांनी सहकार्य केले. मुख्याध्यापक प्रा. एल.एम. भांगे व पर्यवेक्षिका मोरे निलिमा, विश्वास निकम, निखील चेवले उपस्थित होते.