भोर (ता.१९) : तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीवर दोन तरुणांनी वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी महेश अरुण रसाळ,राज सुनिल तिखोळे यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर २०२४ ते जानेवारी २०२५ या काळात महेश अरुण रसाळ याने ट्रॅक्टर शिकवण्याच्या बहाण्याने पीडितेसोबत वारंवार जबरदस्ती केली. या दरम्यान तो पीडितेला धमक्या देत असल्याने ती घाबरली आणि कोणाला काही सांगितले नाही.
यानंतर फेब्रुवारी महिन्यात रात्रीच्या सुमारास राज सुनिल तिखोळे याने आपल्या अल्टो कारमध्ये ओढून पीडितेवर बलात्कार केल्याचे तक्रारीत नमूद आहे. यानंतर ८-१० दिवसांनी घरात कोणी नसताना तिखोळे पुन्हा घरी येऊन अत्याचार केल्याचे पीडितेने फिर्यादीत सांगितले आहे.
दरम्यान, पीडितेला काही दिवसांपासून अशक्तपणा व उलट्यांचा त्रास होऊ लागल्याने तिच्या आईने तिला शिरवळ येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये नेले असता, पीडिता सात महिन्यांची गरोदर असल्याचे समोर आले. त्यानंतर पीडितेने धैर्य एकवटून महेश अरुण रसाळ,राज सुनिल तिखोळे यांच्यावर शिरवळ पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली.
यानंतर सदर तक्रार राजगड पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आली असून या प्रकरणी पोलिसांनी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला असून संशयित आरोपींना अटक केली. याप्रकरणी पुढील तपास राजगड पोलिस करत आहे.