भोर- मुळशी-राजगड विधानसभा मतदारसंघातील विकासकामे वेगाने व्हावीत व वन विभागाच्या हद्दीतील वादात अडीअडचणीमुळे रखडलेली साधारण ५५ ते ६० गावांमध्ये प्रलंबित असलेली कामे त्वरित मार्गी लागावी या उद्देशाने पुणे वन विभागाचे उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांच्या सोबत भोर राजगड मुळशीचे विद्यमान आमदार शंकर मांडेकर यांची पुणे येथे विशेष बैठक संपन्न झाली. या बैठकीत राजगड, रायरेश्वर, बनेश्वर, मढे घाट रस्ता घोल – कुंबे रस्ता, देवघर यांसह ५०-६० विविध गावच्या विकास कामांच्या बाबतीत सविस्तर चर्चा झाली. ग्रामविकासाशी निगडित प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील व मतदारसंघाच्या सर्वांगीण प्रगतीस नवे बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
या बैठकीला भोर सहाय्यक वनसंरक्षक शितल राठोड, भोर वन परिक्षेत्र अधिकारी शिवाजी राऊत, राजगड (वेल्हे) वन परिक्षेत्र अधिकारी अनिल लांडगे, नसरापूर वन परिक्षेत्र अधिकारी वसंत चव्हाण, पौड वन परिमंडळ अधिकारी नंदकुमार शेलार, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे, राजगड राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष किरण राऊत, माजी जिल्हा परिषद सदस्य अमोल नलावडे, पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य चंद्रकांत बाठे, भोर पंचायत समितीचे माजी उपसभापती विक्रम खुटवड, भोलावडेचे विद्यमान सरपंच प्रवीण जगदाळे, बसरापुरचे माजी सरपंच रमेश झांजले ,म्हाळवडीचे सरपंच दत्तात्रय बोडके यांच्यासह तीनही तालुक्यातील अनेक गावातील आजी-माजी पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.